आजकाल मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग शेती व्यवसायाकडे वळताना पाहायला मिळत आहे. शेतीत नवनवे प्रयोगही केले जात आहेत. असाच हटके प्रयोग वसईच्या भुईगाव येथील विकास वझे (Vikas Vaze) यांनी केला आहे. विकास वझे हे आधुनिक पद्धतीने खेकड्याची शेती करत आहेत. आयटीआयमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिंद्रा आणि पार्ले सारख्या नावाजलेल्या कंपनीत विकास यांनी नोकरी केली. पण वेगळं काहीतरी करायचं म्हणून त्यांनी २०१६ साली खेकड्याची शेती करण्याचा निर्णय घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्टिकल बॅाक्स क्रॅब फार्मिंग (vertical Box Crab Farming) असा प्रयोग करत विकास यांनी खेकडा शेतीला आधुनिकतेची जोड दिली. सध्या त्यांच्याकडे १००० खेकड्यांची संख्या असून महाराष्ट्रासह देशात आणि परदेशातही त्यांची निर्यात केली जाते. हा व्यवसाय सोपा नाही, त्याला तितकीच मेहनत आणि संयमाची गरज आहे. तेव्हा त्यात यश मिळू शकतं, असं विकास वझे यांनी सांगितलं. ही हटके संकल्पना त्यांना कशी सुचली? त्यांचा एकंदर अनुभव कसा आहे? याविषयी त्यांनी दिलेली सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडीओ नक्की पाहा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goshta asamanyanchi story of vikas vaze a farmer doing vertical box crab farming in vasai bhuigaon pck