पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्ह्य़ातील मिरज येथे पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय १९६२ साली सुरू झाले. ५० व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यमान अधिष्ठाता डॉ. श्रीकांत वाघ यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली व माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने २० व २१ ऑक्टोबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे साजरा करण्यात येणार आहे. या संदर्भात http://www.gmcmiraj.goldenjubillee  या संकेतस्थळावर सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमांची रूपरेखा विशद करण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा खोपोलीतील कुलकर्णी नर्सिग होमचे संचालक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी (एम.डी. मेडिसिन) यांनी दिली. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाला भेट द्यावी. सुवर्ण महोत्सवी सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी डॉ. एस. व्ही. कुलकर्णी (०९४२२४९३९२६), डॉ. पंकज जोशी (०९८५०८७९४२१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कुलकर्णी नर्सिग होम (खोपोली)चे संचालक डॉ. श्रीराम कुलकर्णी यांनी केले आहे.

Story img Loader