महाराष्ट्र सरकारने आयात केलेल्या विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटी इतर राज्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी ५० टक्क्यांनी कमी केले आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले. तसेच यासंदर्भातील अधिसूचना गुरुवारी जारी करण्यात आल्याचेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
“आयात केलेल्या विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटी, खर्चाच्या ३०० टक्क्यांवरून १५० टक्क्यांवर आणण्यात आली आहे,” असे अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.
अधिकाऱ्याने सांगितले की, “आयात केलेल्या विदेशी मद्याच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वर्षाला १०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या कपातीमुळे सरकारचा महसूल २५० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे कारण यामुळे एक लाख बाटल्यांवरून २.५ लाख बाटल्यांची विक्री वाढेल”