सरकार म्हणजे काही लोक असत नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्र असतो. कोणतेही सरकार चाळीस लोकांसाठी चालवलं जात नाही तर तेरा कोटी महाराष्ट्रासाठी चालवलं पाहिजे. हे आत्ता सत्तेत असलेल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे अस मत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर आमदार रोहित पवार प्रथमच आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी नायगाव (ता खंडाळा) या सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी भेट दिली. तेथील स्मारकाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सातारा क्लबमध्ये, पत्रकारांशी संवाद साधला.
राजकीय भूकंप करण्याची क्षमता फक्त जनतेमध्ये आहे. त्यामुळे यापुढे ज्या विधानसभा, लोकसभेच्या व इतर निवडणुका होतील, त्यामध्ये लोकच भूकंप घडवून आणतील. ज्या गोष्टी आज चाललेल्या आहेत त्या लोकांना पटणाऱ्या नाहीत. आज प्रजासत्ताक दिन आहे आणि संविधानाचा अवमान राज्य आणि केंद्रातील सरकार करत आहे. ते लोक बघत आहेत आणि त्यांना या गोष्टी आवडणारे नाहीत. त्यामुळे भूकंप झाला तर ज्यांनी भूकंप घडवून आणला, जे लोक महाराष्ट्रात बाहेर जाऊन सत्ता बदल केला, त्यांच्यातील असंतुष्टामुळेच कदाचित भूकंप होऊ शकतो. पण मोठा भूकंप सामान्य लोक करतील. परत विरोधातील लोक सत्तेत आणि सत्तेची लोक विरोधातही जाऊ शकतील. पहाटेच्या शपथविधी ही शरद पवारांनी खेळी होती व त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचा झाला असे जयंत पाटील म्हणाल्याचे रोहित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले असता ते म्हणाले , जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे चांगले काम सुरू आहे. ते जे काही बोलत असतात त्याला अनेक संदर्भ आणि वेगवेगळे अर्थ असतात, आणि पहाटेच्या शपथविधीला काय घडलं, हे शरद पवार आणि अजित पवार यांना माहित आहे. याविषयी ते काही बोलत नाहीत. मात्र यानंतर काय झालं हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे .
राजकीय पतंगबाजी नितेश राणे यांनी करू नये. शक्ती कायद्यावरून त्यांनी यांनी नितेश राणेंवर निशाणा साधला .सरकारला महिलांच्या महिलांना ताकद द्यायची नाही. युवकांचे आणि महिलांचे प्रश्न मांडण्याऐवजी व सोडवण्याऐवजी टेबल टेनिस प्रमाणे इकडून तिकडे करायचे आहे. त्यामुळे त्यांनी याविषयी पतंगबाजी करू नये. महाराष्ट्र क्रिकेट मध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंचाही समावेश आहे. महिला क्रिकेटमध्ये ही ग्रामीण भागातील मुली पुढे आहेत असे त्यांनी सांगितले.पार्थ पवार नाराज असून ते राष्ट्रवादी सोडणार असल्याचे पडळकर सांगतात, या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले, पार्थ पवार हा माझा भाऊ आहे आणि आम्ही वेळोवेळी चर्चा करत असतो. जे कोण बोलत आहेत त्यांना अजून पवार कळालेले नाहीत. तसेच त्यांना त्यांचाच मतदारसंघ कळलेला नाही. त्यामुळे पवार ही त्यांच्यासाठी फार लांबची गोष्ट आहे. राहिला प्रश्न बारामतीचा त्यासाठी त्यांना बेस्ट ऑफ लक.. कारण लोक निर्णय घेतात, नेते निर्णय घेत नाहीत.
जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजप पीडीपीसोबत युती करत असेल, तर राजकारणात काहीही होऊ शकते. पण येथे भाजप हा आमचा मुख्य विरोधी पक्ष आहे, कारण तो संविधानाच्या विरोधात जात आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी त्यांच्यासोबत जाऊ असे मला वाटत नाही, असे स्पष्ट मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेबाबत विचारले असता रोहित पवार म्हणाले, कोणीही येते आणि बोलून जाते त्यांना पवारच कळलेले नाहीत, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असे ते म्हणाले.सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ असलेल्या नायगावमध्ये विकास कामे करताना राजकारण आणण्याची गरज नाही. येथील विकास कामांचा साडेनऊ कोटी रुपयांचा निधी स्थगित केलेला आहे. ते काम राजकारण न आणता सुरु कसे करता येईल ते पहावे असेही ते म्हणाले.