शिवसेना पक्षात उघड उघड दोन गट पडल्यामुले राज्यात सध्या राजकीय अस्थितरता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांवर येत्या १२ जुलैपर्यंत कोणताही कारवाई करु नये असे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. या निर्देशानंतर आता शिंदे गटाकडून हालचाली वाढल्या आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी सुरक्षित पवलं टाकायला सुरुवात केली आहे. दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी तीन दिवसांमध्ये काढण्यात आलेल्या शासन निर्णयाची माहिती विचारलेली आहे.
हेही वाचा >>> “मुख्यमंत्र्यांना बडव्यांनी घेरले”; बंडखोर आमदार शिरसाठांच्या आरोपावर अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…
राजकीय अस्थितरता निर्माण झाल्यानंतर राज्य सरकारने जीआर काढण्याचा सपाटा लावला आहे. याचीच दखल घेत कोश्यारी यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहिले असून २२ ते २४ जून या कालावधीत निघालेल्या जीआरची माहिती मागवली आहे. कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्रानंतर आता राज्य सरकारला या तीन दिवसांमध्ये घेतलेल्या शासन निर्णयांची सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे.
हेही वाचा >>> ‘मनसे पक्ष नसून डिपॅाझिट जप्तची मशिन, सल्ले घेताना हिशोब बघून घ्या,’ दीपाली सय्यद यांचा एकनाथ शिंदेंना सल्ला
महाविकास आघाडी सरकारने मागील आठवड्याभरात वेगवेगळ्या खात्यांची मिळून एकूण ४४३ जीआर मंजूर केले आहेत. सध्याच्या राजकीय अस्थिरतेमुळे सरकारने हा जीआर काढण्याचा सपाटा लावला आहे. विरोधकांनी यापेक्षा अधिक जीआर काढण्यात आल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता राज्यपालांनी याच जीआरची माहिती आहे.
हेही वाचा >>> “हीच खरी वेळ आहे, बाळासाहेबांच्या दोन्ही लेकरांनी एकत्र येऊन..”, राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचं सूचक वक्तव्य!
दरम्यान, गुवाहाटी येथे असलेल्या बंडखोर आमदारांपैकी काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शिवसेनेकडून केला जातोय. तर जे संपर्कात आहेत, त्यांची नावे सांगून दाखावा, असे आव्हान शिंदे यांनी शिवसेनेला केले आहे. तसेच या सर्व घडामोडी घडत असताना आगामी दोन ते तीन दिवसांत राज्यात भाजपाचे सरकार येणार, असा दावा भाजपाच्या नेत्यांनी केला आहे.