राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन दिलेल्या निवेदनानंतर राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं असून यामध्ये विधीमंडळ अधिवेशन, विधानसभा अध्यक्षपद तसंच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना यासंबंधी योग्य निर्णय घेण्यास सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय लिहिलं आहे पत्रात

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विधानमंडळ सदस्यांच्या एका शिष्टमंडळाने २३ जून रोजी राजभवन येथे भेट घेऊन दोन निवेदनं सादर केली आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर मागणी केली आहे.

यावेळी पत्रात विधानमंडळाचे अधिवेशन अधिक कालावधीसाठी घेण्यासंबंधी, विधानसभा अध्यक्षांचे संविधानिक पद तातडीने भरण्याची कार्यवाही करण्याबाबत आणि राज्यातील ओबीसी आरक्षणाचा विषय प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सद्यस्थितीत न घेण्याबाबत या तीन विषयांचा उल्लेख आहे.

हे तिन्ही विषय महत्वाचे असल्याने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी आणि आपणास त्याबद्दल माहिती द्यावी असं राज्यपालांनी या पत्रात सांगितलं आहे.