मंगळवारी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. या अधिवेशनात राज्य सरकारने २४ विधेयकं मंजूर केली असली, तरी ज्या एका मुद्द्यावरून गेल्या अनेक महिन्यांपासून राजकारण तापलं होतं, ती विधानसभा अध्यक्षांची निवडणूक मात्र राज्य सरकारला घेता आली नाही. अधिवेशनाच्या सुरुवातीपासून महाविकास आघाडीतील नेतेमंडळी याच अधिवेशनात निवडणूक होणार असं ठामपणे सांगत होते. मात्र, शेवटच्या दिवसापर्यंत या निवडणूक प्रक्रियेला राज्य सरकारकडून मंजुरी मिळू शकली नाही.

शेवटच्या दिवशी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रानंतर सगळी सूत्र हलली आणि निवडणूक पुढील अधिवेशनात घेण्याचा निर्णय झाल्याचं सांगितलं गेलं. ही निवडणूक आवाजी पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर तो मुख्यमंत्र्यांच्या पत्रासोबत राज्यपालांकडे पाठवण्यात आला. मात्र, शेवटच्या दिवशी हा प्रस्ताव नाकारत असल्याचं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्राला दिलेल्या उत्तरात नमूद केलं. त्यासोबतच, त्यांनी राज्य सरकारला खरमरीत भाषेत खडे बोल सुनावले आहेत.

Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Supriya Sule
Supriya Sule : महापालिका निवडणुकीबाबतच्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत; म्हणाल्या, “या निवडणुका…”
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Devendra Fadnavis On Raj Thackeray or Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? देवेंद्र फडणवीसांनी दिलं राजकीय उत्तर; म्हणाले, “राजकारणात काहीही…”
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”

..म्हणून परवानगी देता येणार नाही – राज्यपाल

“तुम्ही (निवडणुकीबाबतचे) नियम बनवताना घटनेच्या कलम २०८ चा आधार दिला आहे. पण त्याच कलमात हेही म्हटलं आहे की घटनेतील तरतुदींचं पालन करूनच राज्य सरकार नियमांमध्ये बदल करू शकतं. मी राज्यघटनेचं रक्षण करण्याची शपथ कलम १५९ नुसार घेतली आहे. त्यामुळे नियमांमध्ये सुधारणा करून या निवडणुका घेण्याची ही पद्धत प्रथमदर्शनी घटनाविरोधी वाटत असताना त्याला सध्या तरी परवानगी देता येणार नाही”, असं राज्यपालांनी या पत्रात म्हटलं आहे.

“राज्य सरकारनं ११ महिने घेतले”

दरम्यान, या निवडणुका घेण्यासाठी राज्य सरकारने ११ महिने घेतल्याचा मुद्दा देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थित केला आहे. “विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुम्ही ११ महिने घेतले. त्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळ नियम ६ आणि ७ यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले हेही इथे नमूद करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे या बदलांचा कायदेशीरदृष्ट्या अभ्यास करणं महत्त्वाचं आहे”, असं देखील राज्यपालांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.

अखेर ठरलं! विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आता पुढच्याच वर्षी; राज्यपालांचं पत्र आणि शरद पवारांच्या फोन कॉलनंतर सूत्र फिरली?

माझ्यावर दबाव टाकता येणार नाही…

घटनाविरोधी गोष्टीला परवानगी देण्यासाठी आपल्यावर दबाव टाकता येणार नाही, असं राज्यपालांनी पत्रात म्हटलं आहे. “मी कधीही सभागृहांचे अधिकार किंवा त्यांची कार्यपद्धती यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं नाही. पण घटनेच्या कलम २०८ नुसार जी प्रक्रिया घटनाविरोधी दिसत आहे, तिला परवानगी देण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जाऊ शकत नाही”, अशा शब्दांत राज्यपालांनी राज्य सरकारला सुनावलं आहे.

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा पेच, शरद पवारांचा उद्धव ठाकरे यांना फोन; म्हणाले…

“तुमच्या भाषेमुळे मी दु:खी”

दरम्यान, पत्रातील भाषेमुळे आपण दु:खी झाल्याचं राज्यपाल म्हणाले आहेत. “तुम्ही पत्रात वापरलेली भाषा असह्य आणि धमकीवजा होती. यामुळे सर्वोच्च घटनात्मक कार्यालय असलेल्या राज्यपालांच्या कार्यालयाचा अपमान झाला असून त्याची प्रतिमा मलीन झाली आहे”, असं या पत्रात राज्यपालांनी नमूद केलं आहे.

Story img Loader