राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना घेऊन जाणारे विशेष हेलिकॉप्टर शुक्रवारी सकाळी नांदेडजवळ काही वेळ भरकटले. पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी राज्यपालांना नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे जायचे होते. तिथे जात असतानाच हेलिकॉप्टर भरकटले आणि ते तेलंगणाच्या सीमेवर जाऊन पोहोचले. हेलिकॉप्टर भरकटले असल्याचे लक्षात आल्यावर वैमानिकाने हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत ते पुन्हा किनवटजवळ आणले. जंगलाचे क्षेत्र असल्यामुळे सुमारे २५ मिनिटे हे हेलिकॉप्टर भरकटल्याची माहिती मिळाली.
(संग्रहित छायाचित्र)
राज्यपालांचे हेलिकॉप्टर नांदेडजवळ थोडावेळ भरकटले
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना घेऊन जाणारे विशेष हेलिकॉप्टर शुक्रवारी सकाळी नांदेडजवळ काही वेळ भरकटले.
First published on: 29-05-2015 at 03:12 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Governors special helicopter dislocated for few minutes