राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना घेऊन जाणारे विशेष हेलिकॉप्टर शुक्रवारी सकाळी नांदेडजवळ काही वेळ भरकटले. पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी राज्यपालांना नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे जायचे होते. तिथे जात असतानाच हेलिकॉप्टर भरकटले आणि ते तेलंगणाच्या सीमेवर जाऊन पोहोचले. हेलिकॉप्टर भरकटले असल्याचे लक्षात आल्यावर वैमानिकाने हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत ते पुन्हा किनवटजवळ आणले. जंगलाचे क्षेत्र असल्यामुळे सुमारे २५ मिनिटे हे हेलिकॉप्टर भरकटल्याची माहिती मिळाली.
(संग्रहित छायाचित्र)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा