प्रगत वैद्यकीय उपचारासाठी कॉ. गोिवद पानसरे यांना युंबईला हलविले जात असताना येथील अ‍ॅस्टर आधारमध्ये जमलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना संमिश्र होत्या. अण्णा मुंबईला जाऊन बरे होऊन परत येतील असा विश्वास बाळगत कार्यकत्रे चार दिवसांनंतर घरी परतले. निद्रेच्या अधीन जाण्याची तयारी करीत असतानाच अण्णा गेले अशी बातमी येऊन थडकली आणि कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. पानसरे यांच्या आठवणी जाग्या करीत कार्यकर्त्यांनी अवघी रात्र जागून काढली.
१६ फेब्रुवारी रोजी गोिवद पानसरे व उमा पानसरे या उभयतावर गोळीबार करण्यात आला. जखमी अवस्थेतील पानसरे दाम्पत्याला घराजवळच असलेल्या अ‍ॅस्टर आधार इस्पितळात दाखल करण्यात आले. पानसरे यांच्या शरीरात तीन ठिकाणी गोळ्या घुसल्या होत्या. तेथे डॉक्टरांच्या पथकाने शस्त्रक्रिया केली. उमा पानसरे यांच्या कवटीला चाटून गोळी गेल्याने त्यांचीही या भागाची शस्त्रक्रिया करण्यात आली. १६ फेब्रुवारीचा अवघा दिवस शस्त्रक्रिया करण्यात आणि डॉक्टरांकडून येणारी माहिती घेण्यात घालविला. दुसऱ्या दिवसापासून प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिळू लागल्याने कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील तणाव दूर झाला. तिसऱ्र्या दिवशी तर प्रकृती चांगली सुधारल्याचे सांगितले. पण चौथ्या दिवशी मात्र गोिवद पानसरे यांना पुढील प्रगत उपचारासाठी मुंबईला हलविण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. डॉक्टरांच्या या निर्णयामुळे कार्यकत्रे चलबिचल बनले. त्यांना अण्णांच्या प्रकृतीविषयी साशंकता जाणवू लागली. याचवेळी मुंबईत प्रगत उपचार मिळाल्याने ते बरे होतील असा विश्वासही वाटू लागला. यामुळेच डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना बांध घालत कार्यकर्त्यांनी अण्णांना मुंबईला जाण्यासाठी निरोप दिला. पानसरे यांना इस्पितळात दाखल केल्यापासून कार्यकर्त्यांचा तळ तेथेच पडला होता. दिवसात मिळेल तितका वेळ ते इस्पितळातच घालवत होते. शुक्रवारी दुपारी एअर अ‍ॅम्ब्युलन्समधून अण्णांना मुंबईला पाठविण्यात आले. आणि प्रथमच कार्यकर्त्यांनी घरामध्ये काहीशा निवांतपणे पाठ टेकली. काहीजण झोपी गेले असतानाच झोपेची तयारी करत असतानाच अण्णा गेल्याचा निरोप येऊन थडकला. मनात चुकचुकत असलेली शंका खरी ठरली आणि आपण पोरके झालो या भावनेने अश्रू आवरणे कठीण होऊन बसले. अश्रूंना सोबत घेतच कार्यकत्रे दसरा चौकात रात्री जमू लागले. अमर रहे, अमर रहे, पानसरे अमर रहे, पानसरेंचे अपूर्ण काम कोण करणार आम्ही करणार आम्ही करणार, लाल सलाम लाल सलाम, पानसरेंना लाल सलाम, अशा घोषणा दिल्या जात होत्या. स्त्री-पुरूष कार्यकत्रे ओक्सा-बोक्सी अश्रू ढाळत होते. दसरा चौकात शनिवारी भाकपच्या राज्यव्यापी अधिवेशनाला सुरुवात होणार होती. त्यासाठी खास मंडपही उभारण्यात आला होता. या मंडपामध्ये गोिवद पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली २२ वे अधिवेशन भरणार होते. राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पानसरे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाचा पुष्पहार घातला जाणार होता. पण वेळ अशी घातकी की पानसरे यांच्या पाíथवावर पुष्पहार घालावा लागला. ज्या मंडपात पानसरे यांच्या व्याख्यानातून प्रबोधनाची धगधगती मशाल काययची शांत झाली. अनेक ऐतिहासिक क्षण डोळ्यात साठवणाऱ्या दसरा चौकाने हा एक ऐतिहासिक दुखदायक क्षण अनुभवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा