कॉम्रेड गोविंद पानसरे यांना एअर अॅम्ब्युलन्सच्या साह्याने शुक्रवारी संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात हलविण्यात आले. पानसरे यांच्यावर उपचार सुरू असलेल्या ‘अॅस्टर आधार’ रुग्णालयातील डॉक्टरांशी आणि पानसरे यांच्या कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर राज्य सरकारकडून त्यांना मुंबईला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.  
कॉम्रेड पानसरे यांच्या हल्लेखोरांचे रेखाचित्र तयार
गोविंद पानसरे आणि त्यांची पत्नी उमा यांच्यावर सोमवारी सकाळी कोल्हापुरातील त्यांच्या निवासस्थानाजवळ दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. यामध्ये गोविंद पानसरे यांना तीन गोळ्या लागल्या होत्या. कोल्हापूरमधील रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रियांनंतर गोविंद पानसरे यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, गुरुवारी त्यांच्या फुफ्फुसाला सूज आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात हलविण्यावर विचार सुरू करण्यात आला होता. शुक्रवारी दुपारी त्यांना कोल्हापूरातील रुग्णालयातून अॅम्ब्युलन्समधून तेथील विमानतळावर नेण्यात आले. तेथून एअर अॅम्ब्युलन्सच्या साह्याने संध्याकाळी त्यांना ब्रीड कॅंडीमध्ये हलविण्यात आले. गोविंद पानसरे यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी सांगितले.
भाजप सरकार त्यांची नैतिक जबाबदारी काय मानतात? – मुक्ता दाभोलकरांचा प्रश्न
पानसरे हल्ला प्रकरणी तपासात प्रगती नाही

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा