अयोध्येत नव्या बांधलेल्या श्री राम मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी बोलताना गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. यानंतर गोविंदगिरी महाराजांवर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विविध नेत्यांनी टीका केली होती. आता गोविंदगिरी महाराजांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

गोविंदगिरी महाराज काय म्हणाले होते?

“छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे महापुरूष आपल्याला ( नरेंद्र मोदी ) मिळाले आहेत. ज्यांना जगदंबा मातेनं हिमालयातून भारत मातेच्या सेवेसाठी पाठवलं आहे. रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं वर्णन, ‘निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंतयोगी’, असं केलं होतं. आपल्यालाही श्रीमंतयोगी ( नरेंद्र मोदी ) प्राप्त झाले आहेत,” असं म्हणत गोविंदगिरी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधानांबरोबर केली होती.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण

हेही वाचा : पंतप्रधानांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना, संभाजीराजे म्हणाले, “या जगात…”

“छत्रपतींनी जीवनात केलेल्या गुणांचं अनुसरण पंतप्रधानांही त्यांच्या जीवनात करतायत”

‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना गोविंदगिरी महाराज म्हणाले, “माझ्या आयुष्यात मी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कुणाशीही करणार नाही. प्रभू श्री राम आणि श्री कृष्णानंतर मला छत्रपती शिवाजी महाराज सर्वश्रेष्ठ वाटतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुणांचं अनुसरण काहीजण करतात. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आहेत, हे सांगण्यात मला कुठलाही संकोच वाटला नाही. कारण, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात केलेल्या गुणांचं अनुसरण पंतप्रधान आपल्या जीवनात करताना दिसत आहे.”

“सदगुणांचा गौरव करण्यात कुठलाही संकोच नाही”

“एखाद्या चुकीच्या गोष्टीवर आपण टीका करतो. त्याप्रमाणे सदगुणांचा गौरव करण्यात कुठलाही संकोच वाटत नाही. ज्यांची मनं कोती असतात, मनात राजकारण भरलेले असतं. त्यांच्या तोंडी अशा प्रकारच्या गोष्टी येतात,” असं प्रत्युत्तर टीकाकारांना गोविंदगिरी महाराजांनी दिलं आहे.

हेही वाचा : VIDEO : “नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यासाठी आम्हीही प्रचार केला, तेव्हा…”, उद्धव ठाकरेंचा सवाल

उद्धव ठाकरेंनी काय टीका केली होती?

“श्री रामाचे मुखवटे घालून रावण फिरत आहेत. त्यांचे मुखवटे फाडायचे आहेत. अंधभक्तांच्या बुद्धीचा मी आदर करतो. पण, कुणीतरी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान मोदींबरोबर केली. पण, छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान मोदींबरोबर होऊ शकत नाही,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं.

Story img Loader