जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी भारताची ओळख आहे. येत्या ३० जानेवारीला पदवीधर मतदार संघाच्या निवडणूका आहे. पदवीधरांच्या परिक्षा आणि निवडणूका एकाच दिवशी आल्यामुळं मोठा पेच निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढावा अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. या संदर्भात पडळकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. या लोकशाहीत निवडणूका अत्यंत महत्त्वाच्या आहेत.अशा परिस्थितीत कोण्याही व्यक्ती अथवा वर्गाला मतदानापासून वंचित रहावे लागणे त्याच्यावर अन्याय होण्यासारखे आहे.
येत्या ३० जानेवारीला पदवीधर मतदार संघाच्या निवडणूका आहेत. याच दिवशी नगरविकास, विधी व न्याय , वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये , सार्वजनिक आरोग्य या विभागांच्या गट ‘अ’ आणि ‘ब’ साठी विविध विभागांच्या परिक्षा होणार आहेत. राज्यातील विविध ठिकाणी परिक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. शिवाय त्या दिवशी दोन सत्रात या परिक्षा पार पडणार आहेत. या सर्व कारणांमुळे तब्बल १० हजारांहून अधिक उमेदवार ‘पदवीधर’ आमदार निवडणूकीच्या मतदानापासून वंचित राहणार आहेत.
हेही वाचा >>> उमेदवार शिक्षक परिषदेचा, प्रतिष्ठा भाजपची दावणीला
भारत हा युवकांचा देश आहे. या पदवीधर युवकांच्या भवितव्याची दिशा ठरवण्याचं काम ‘पदवीधर’ आमदार करतात. मात्र तब्बल १० हजार पदवीधरांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जाणार आहे. या गंभीर मुद्द्याकडे आपले लक्ष वेधण्यासाठी हे पत्र मी लिहीत असून यावर तोडगा काढावा अशी मागणी पडळकर यांनी केली आहे.
हेही वाचा >>> मुंबई महानगरपालिकेची सत्ता काबीज करणे भाजप आणि शिंदे गटाला सोपे आहे का?
लोकशाहीला अधिक बळकटी देण्याचे काम निवडणूका करत असतात. निवडणूकांवर आणि पदवीधरांच्या भवितव्यावर याचा परिणाम होऊ शकतो. अशा या गंभीर मुद्द्याची दखल आपण घ्याल, यावर आपण सकारात्मक तोडगा काढाल अशी अपेक्षा माझ्यासह १० हजार पदवीधर मतदारांना आहे असेही पडळकर यांनी पत्रात म्हटले आहे.