मोहनीराज लहाडे, लोकसत्ता

नगर : गेल्या वर्षी ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या जिल्ह्यातील शेकडो उमेदवारांना त्यांची अनामत रक्कम परत मिळालेली नाही.  जानेवारी २०२१ मध्ये जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यासाठी २३ हजार ८१५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. काहींच्या अनामत रकमा जप्त झाल्या असल्या तरी विजयी व पराभूत झालेल्या उमेदवारांना अनामत रक्कम परत मिळाली नाही. उमेदवार तहसील कार्यालयात चकरा मारतात मात्र त्यांना दाद मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यात जमा झालेल्या काही लाखांच्या रकमेचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Vanchit Bahujan Aghadi, Bahujan Samaj Party,
आंबेडकरी पक्षांच्या उमेदवारांचा वेलू गगनावरी !
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
Mega Housing Lottery application process, entension, CIDCO
सिडकोच्या २६ हजारांच्या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ
Kalyan Dombivli assembly election campaign wage rates labour
कल्याण-डोंबिवलीत प्रचार टिपेला, मजुरीचे दर शिगेला; प्रचारासाठी लागणाऱ्या मजुरांचे दर २५० ते १२०० रूपये
इक्विटी म्युच्युअल फंडात ऑक्टोबरमध्ये विक्रमी ४१,८८७ कोटींचा ओघ
army recruitment, Deolali camp, nashik district
सैन्य भरतीसाठी देवळाली कॅम्प येथे एकाच दिवसात १२ हजार तरुण उपस्थित

ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वसाधारण जागेवरील उमेदवाराला ५०० रुपये तर राखीव जागेवरील उमेदवाराला १०० रुपये अनामत रक्कम अर्जासमवेत जमा करावी लागत होती. ही रक्कम निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देण्यात आली, त्याची त्यांना रितसर पावतीही मिळाली.  अनामत रकमेचा आकडा कमी असल्याने काहीजण दुर्लक्ष करत असले तरी काहीजण ती परत मिळण्यासाठी चिकाटीने पाठपुरावा करत आहेत.  ही रक्कम परत देणे बंधनकारक आहे.

निवडणुकीसाठी कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, ‘जीएसटी’चे कर अधिकारी, विस्तार अधिकारी, भूमिअभिलेखमधील उपअधीक्षक या पदावरील कर्मचाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तालुका निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदारांकडे जबाबदारी देण्यात आली होती. एका कर्मचाऱ्याकडे लोकसंख्येनुसार १ किंवा २ ग्रामपंचायतीची सूत्रे होती. उमेदवारांच्या अनामत रकमा जमा करण्यासाठी कोणतेही स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आले नव्हते. या रकमा निवडणूक अधिकाऱ्याकडे जमा केल्या होत्या. 

निवडणुकीत ठरावीक संख्येने कमी मते मिळणाऱ्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होते. मात्र विजयी व पराभूत उमेदवारांनी वारंवार तहसील कार्यालयाकडे संपर्क साधूनही त्यांना त्यांची अनामत रक्कम परत मिळालेली नाही. ७६७ पैकी पूर्णत: बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या ५३ होती तर ७०५ ग्रामपंचायतींच्या एकूण ७ हजार १६१ जागांसाठी निवडणूक झाली. त्यातील ४० जागा एकही उमेदवारी अर्ज न आल्यामुळे रिक्त राहिल्या.

१ हजार ३३३ जागांसाठी एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्या बिनविरोध झाल्या. प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या जागांची संख्या ५ हजार ७८८ होती.

किती उमेदवारांनी त्यांची अनामत रक्कम परत नेली, याची माहिती नगरच्या तहसील कार्यालयाकडे नाही. जिल्ह्यातील इतर तहसील कार्यालयात वेगळी परिस्थिती नाही. निवडणूक अधिकारी वेगवेगळय़ा विभागांचे असल्यामुळे ते कोण व कोठे आहेत याची माहिती उमेदवारांना नाही. निवडणूक अधिकारी तहसील कार्यालयाकडे दप्तर जमा केले असाही बचावात्मक पवित्रा घेऊ लागले आहेत. 

नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी एकूण १ हजार ९३१ उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी कोणीही आत्तापर्यंत त्यांच्या अनामत रकमा परत नेल्या नाहीत. सर्व अनामत रकमा संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आहेत.

उमेश पाटील, तहसीलदार, नगर

निवडणुकीसाठी जमा केलेली अनामत रक्कम वर्षभरानंतर जर परत मिळत नसेल तर जिल्हाधिकारी, राज्य निवडणूक आयोगाने त्याची दखल घ्यायला हवी. ही रक्कम निवडणूक अधिकाऱ्याकडे पडून आहे, की त्यांनी ती सरकार जमा केली, सरकार जमा केली नसेल तर त्याचा अपहार झाला आहे का, याचीही चौकशी व्हायला हवी. ही रक्कम किती दिवसांत परत मिळायला हवी, याचाही निर्णय आयोगाने घ्यावा. या रकमेवर विशिष्ट मुदतीत कोणी दावा दाखल केला नाही तर सरकार जमा करण्याचा निर्णय घ्यावा. 

अ‍ॅड. जी. आर. पालवे 

वारंवार मागणी करूनही नगर तालुक्यातील एकाही उमेदवाराला त्याची अनामत रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे गेल्या सप्टेंबर २०२१ मध्ये तहसील कार्यालयाला निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले. मात्र त्याची दखल घेतली नाही. आता ही रक्कम व्याजासह मिळावी. 

राजू दारकुंडेग्रामपंचायत सदस्य, बहिरटवाडी 

मी स्वत: तहसील कार्यालयात अनामत रक्कम परत मिळावी यासाठी संपर्क केला होता. नंतर बघू, सध्या इतर कामांची गडबड आहे, असे सांगून अधिकाऱ्यांकडून बोळवण करण्यात आली. भोरवाडीमध्ये एकूण ३८ उमेदवार होते.

 –भास्कर भोर, सरपंच, भोरवाडी