Gram Panchayat Election 2022 Results: राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होणार आहे. रविवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. पुणे जिल्ह्यासहीत अनेक ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून काही ठिकाणी सकाळी आठ पासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीतील सदस्यांसह थेट सरपंच पदासाठीही रविवारी मतदान पार पडलं. यापैकी सर्वाधिक ग्रामपंचायती विदर्भातील होत्या. विदर्भात एकूण २२७६ ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं असून आज कोण बाजी मारणार याबद्दल गावागावांमध्ये उत्सुकता आहे. विदर्भाबरोबरच सिंधुदुर्गमधील २९३, कोल्हापूरात ४३१, सोलापूरमध्ये १४१८, नागपूरात २३६ ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये १९६, अहमदनगरमध्ये १९६५ आणि बीडमधील ६७० ग्रामपंचायतींचा निकालही आज जाहीर होणार आहे.

Congress List for delhi assembly Election
Delhi Election : आता दिल्ली विधानसभेची धूम! काँग्रेसने जाहीर केली २१ उमेदवारांची यादी, अरविंद केजरीवालांसमोर तगडा उमेदवार!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक

पहिला निकाल हाती; मुश्रीफ गटाला धक्का

कागल तालुक्यातील बामणीतून सकाळी आठ वाजताच पहिला निकाल समोर आला आहे. बामणीमध्ये सत्तांतर झालं असून मुश्रीफ गटाला मोठा धक्का समरजितराजे गटाने दिला आहे. सरपंचासह समरजितराजे गटाने निवडणुकीत बाजी मारली आहे.

पुण्यात पाच जागी अर्जच नाही

पुणे जिल्ह्यातील १७६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकींचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीमध्ये सरपंचपदाची निवड थेट जनतेमधून होणार आहे. मात्र, जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी कोणीही अर्ज न भरल्याने हे पद रिक्त राहिले आहे. तर, ग्रामपंचायत सदस्यपदाच्या ७९ जागा रिक्त राहिल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतीपैकी ४५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या, तर १७६ ग्रामपंचायतींसाठी मतदान रविवारी झाले. सरपंच पदासाठी भोर तालुक्‍यातील दोन गावे, दौंडमधील एक, जुन्नर आणि मुळशीतील प्रत्येकी एका गावाचा समावेश आहे. तर, ग्रामपंचायत सदस्य पदासाठी वेल्हा तालुक्‍यातील १८, भोरमधील २२, दौंडमधील एक, जुन्नरमधील १६, आंबेगावमधील आठ, खेडमधील दोन, मावळातील एक आणि मुळशीमधील ११ ग्रामपंचायत सदस्य पदे रिक्त आहेत.

नक्की वाचा >> Gram Panchayat Election Results: फडणवीस प्रचंड आशावादी! म्हणाले, “कोणी काहीही काळजी करु नका, लिहून घ्या की महाराष्ट्रात…”

पुण्यातून किती उमेदवार

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य पदाच्या १०६२ जागांसाठी तब्बल ३३१३ उमेदवार रिंगणात होते. सरपंच पदाच्या १६७ जागांसाठी ५१९ उमेदवार रिंगणात होते. एका बाजुला बहुतेक गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरस पहायला मिळाली. मात्र, दुसरीकडे ७९ जागांसाठी उमेदवारी अर्जच न आल्याने हे पद रिक्त राहिले आहे. निवडणुकीसाठी कोणी अर्ज भरले नाहीत, तर काहींचे अर्ज बाद झाले. यामुळे सदस्य पद रिक्त राहिले आहे. आता पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाकडून जाहीर होईल. त्यानंतरच या जागांसाठी निवडणुक प्रक्रिया पार पाडली जाईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नक्की वाचा >> फडणवीसांनी भाजपा आमदारांना झापलं; म्हणाले, “काही आमदार असे आहेत ज्यांच्या फेसबुकवर…”

राज्यातील अनेक ग्रामपंचायती बिनविरोध

७ हजार ७५१ ग्रामपंचायतींपैकी अनेक ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यामध्ये रायगडमधील ५०, बीडमधील ३४, कोल्हापूरमधील ४३, सांगलीतील २८, सिंधुदुर्गमधील ४४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Story img Loader