मे, जून आणि जुल या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या २२ एप्रिलला होणार असून जिल्ह्यात ४८६ ग्रामपंचायती निवडणुकीसाठी सज्ज झाल्या आहे. ३३५३ सदस्य निवडण्यासाठी साडे सहा लाख मतदार मतदान करणार आहेत. जिल्ह्यात २९२ सरपंचपदे महिलांच्या ताब्यात राहणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या एकूण १० हजार ७०६ उमेदवारांपकी ५०६ उमेदवारांचे अर्ज छाननीत रद्द ठरले आहेत. ६२ जागी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुका पक्ष चिन्हांवर लढल्या जात नसल्या तरी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय इत्यादी सारेच पक्ष आपापल्या गटांसह मदानात उतरले आहेत. एकूण मतदारांमध्ये पुरुष ३ लाख ६ हजार ४२०, तर महिला ३ लाख ४० हजार २५७ आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने मे २०१५ ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत, गडचिरोली जिल्हा वगळता मुदत संपणाऱ्या राज्यातील ८१०८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. त्याप्रमाणे या जिल्ह्यातील १६ तालुक्यांमधील ६६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा होऊन राजकीय पक्षांनी व जिल्हा प्रशासनानेही निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली होती. मात्र, त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा, पोलीस बळाची कमतरता, आíथक चणचण आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका सध्याच न घेण्याबद्दल आमदारांनी शासनाला केलेली विनंती लक्षात घेऊन ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय निर्वाचन आयोगाने घेतला आहे. मात्र मे, जून, जुलमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणूका पूर्वी जाहीर झाल्याप्रमाणे २२ एप्रिलला होणार आहे.
या जिल्ह्यात त्याप्रमाणे ६६३ ग्रामपंचायतींच्या घोषित निवडणुकांपकी आता १८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित झाल्याने उर्वरित ४८१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. १५६ ग्रामपंचायती अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. ७ एप्रिलला एक हजार सत्तेचाळीस सरंपचपदांचे आरक्षण जाहीर झाले आहे.
२१ एप्रिलपर्यंत निवडणूक प्रचार करता येईल आणि २२ ला मतदान झाल्यानंतर २३ एप्रिलला निकाल जाहीर होतील. निवडणुकीत इव्हीएमचा वापर होणार आहे.
निवडणूक हाणामारीचा श्रीगणेशा
घाटंजी तालुक्यात काँग्रेसच्या देवानंद पवार यांना जबर मारहाण झाल्यानंतर भाजपचे नगरसेवक सतीश मलकापुरे यांच्या घरावरही पवार समर्थकांचा मोर्चा गेला आणि घरातील सामानांची नासधूस केली. त्यामुळे भाजपने घाटंजी बंदचे आंदोलन केले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. या जिल्ह्य़ातील १६ तालुक्यांपकी निवडणुका होणाऱ्या सर्वाधिक ५३ ग्रामपंचायती दारव्हा तालुक्यात, तर सर्वात कमी म्हणजे १५ झरी जामणी तालुक्यात आहेत. पुसद तालुक्यात ४९, यवतमाळ ४२, वणी ४०, महागाव ३८, आर्णी ३५, पांढरकवडा ३३, उमरखेड आणि दारव्हा प्रत्येकी ३०, बाभुळगाव, नेर आणि घाटंजी प्रत्येकी २४, राळेगाव २९ व मारेगाव २० ग्रामपंचायतींमध्ये या निवडणुका होणार आहेत.