रायगड जिल्ह्यात २४० ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी मंगळवारी पार पडली. या निवडणूकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेनी आपला वरचष्मा राखला. मात्र महाविकास आघाडीची कामगिरी लक्षवेधी ठरली. शेकापची आणि काँग्रेसची पिछेहाट पुन्हा एकदा पहायला मिळाली.
रायगड जिल्ह्यात २४० ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडूक पार पडली. मंगळवारी मतमोजणी नंतर निकालाचे चित्र स्पष्ट झाले. या निवडणूकीत बाळासाहेबांची शिवसेनेनी सर्वाधिक ७९ जिंकल्या. त्याखालोखाल महाविकास आघाडीने ३९. राष्ट्रवादी काँग्रेस ३०, शेतकरी कामगार पक्ष ३०, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट २३, भारतीय जनता पार्टी १८ काँग्रेस ३ ग्रामंपचायतींवर वर्चस्व मिळावले. तर १८ ठिकाणी अपक्ष तथा स्थानिक आघाडीचे उमेदवार निवडून आले.
हेही वाचा >>> Sangli Gram Panchayat Election Result 2022; सांगलीतील ११० ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता; भाजपा दुसऱ्या स्थानी
विधानसभेची रंगीत तालीम म्हणून या निवडणूकीकडे पहायले जात होते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूकीवर लक्ष केंद्रीत केले होते. पक्षांची ताकद आहे तिथे स्वबळावर जिथे ताकद नाही तिथे युती आघाडीच्या माध्यमातून निवडणूका लढविण्यावर भर देण्यात आला होता. त्यामुळे या निवडणूकीत बाजी कोण मारणार याची उत्सुकता लागून राहीली होती.
हेही वाचा >>> बाळासाहेब थोरातांच्या संगमनेरमधील जोर्वे गावात सरपंचपदावर राधाकृष्ण विखे गटाचा विजय, कोणाला किती जागा? वाचा…
५० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे १९१ ग्रामपंचायतीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रीया पार पडली होती. मतदानाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. ८० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे मतदानाच्या वाढलेल्या टक्क्याचा फायदा कोणाला होणार यावर सर्वांचे लक्ष्य लागून राहीले होते. मंगळावारी जास्त ग्रामपंचायती असलेल्या तालुक्यांमध्ये सकाळी साडे आठ वाजल्या पासून मतमोजणीला सुरवात झाली. तर कमी ग्रामपंचायती असलेल्या तालुक्यात ११ वाजता मतमोजणीचे काम सुरु झाले. दुपारी १ वाजेपर्यंत सर्व ठिकाणचे निकाल स्पष्ट झाले. महाड पोलादपूर बाळासाहेबांच्या शिवसेनेनी वर्चस्व राखले, अलिबाग आणि मुरुड मध्येही बाळासाहेबांच्या शिवसेनेचा वरचष्मा पहायला मिळाला. रोहा, म्हसळा, श्रीवर्धन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली. माणगाव मध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने मतदारांनी कौल दिला. पेण मध्ये शेकापने आपले अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखीत केले. पनवेल आणि उरण मध्ये भाजपचा प्रभाव वाढत असल्याचे दिसून आले. पक्षांतर्गत फुटीनंतरही शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उरण, कर्जत, खालापूर तालुक्यात आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवून दिले