राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत असून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, भाजपा पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा नेते करत आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून आपला पक्ष पहिला, तुमचा पक्ष दुसरा म्हणणं बालिशपणा असल्याचं म्हटलं आहे.
“ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर समाधान की असमाधान असा प्रश्न नाही. या निवडणुकीचं वातावरण वेगळं असतं. काही ठिकाणी स्थानिक आघाड्या असतात तर काही ठिकाणी गावकरी एकत्र येऊन निवडणुका लढवत असतात. त्यामुळे हे कोणत्याही एका पक्षाचं यश, अपयश नाही. पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक असं काही नसतं,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
“वर्षानुवर्षं आपण हे आकडे ऐकत आहोत. याच्यात फोलपणा किती हे कालांतराने कळतं. आपला पक्ष पहिला, तुमचा पक्ष दुसरा म्हणणं बालिशपणा आहे,” असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
एकनाथ शिंदेंवर टीका
“नागपूर खंडपीठाने दिलेला स्थगिती आदेश गंभीर आहे. उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे हा जुना विषय इतका सोपा असेल तर इतकी वर्ष कोर्टात का होता? स्थगिती का देण्यात आली आहे? स्थगिती देताना प्रकरणी न्यायप्रविष्ट विषय असताना सरकारने यामध्ये हस्तक्षेप केल्याचं सांगितलं आहे. याला आमचा विरोध आहे. ज्या खात्याचा निर्णय आहे त्या खात्याचे मंत्री मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सरकारकडून बाजू मांडली जाणार असेल तर त्यात हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण निर्णय घेणारे तेच आहेत,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
“आरोप झाल्यावर याआधीही मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. यंत्रणेवर अवाजवी दवाब असता कामा नये. कायद्यानुसार झालं असेल तर कोर्टाने स्थगिती का दिली हे महत्त्वाचं आहे. जेव्हा न्यायालय हस्तक्षेप झाल्याचं सांगतं तेव्हा ही बाब गंभीर आहे. त्यामुळे जोपर्यंत निकाल लागत नाही तोवर त्या व्यक्तीने पदावर राहणं योग्य नाही,” अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.
जेलमध्ये असणाऱ्या मंत्र्यांचा तेव्हा राजीनामा मागितला नाही, मग आता माझा राजीनामा का मागताय? अशी विचारणा एकनाथ शिंदेंनी केली आहे. त्यावर ते म्हणाले “त्यांना जेलमध्ये तरी टाकलं ना. त्यांना जेलमध्ये टाकणाऱ्यांना हे चालतं का विचारा. चोरी केली असेल तर मग कोणीही केली तरी ती चोरीच आहे. गुंतागुंत करण्यापेक्षा मुद्द्याचं बोलावं. आक्षेप आम्ही नाही तर कोर्टाने घेतला आहे. अशी उत्तरं देऊन तुम्ही वेळ मारुन नेऊ शकत नाही”