राज्यातील २३५३ ग्रामपंचायतींमधील २० हजारपेक्षा अधिक जागा तसेच तीन हजार पोटनिवडणुका अशा एकूण सुमारे २५ हजार जागांसाठी काल (५ नोव्हेंबर) राज्यात मतदान झाले. नक्षलग्रस्त भाग वगळता राज्यातील अन्य ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी आज (६ नोव्हेंबर) होईल. तर नक्षलग्रस्त भागांमध्ये मंगळवारी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे, ग्रामपंचायतींच्या निवडणुका पक्षीय पातळीवर होत नसल्या तरी राजकीय नेत्यांना आपापल्या प्रभाव क्षेत्रातील ताकदीचा या निमित्ताने अंदाज येणार आहे.

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडल्या आहेत. परंतु, ग्रामपंचयातींच्या निवडणुकांचा धडाका सुरू आहे. राज्यातील २३५३ ग्रामपंचायतींसाठी काल (५ नोव्हेंबर) मतदान झाले. यापैकी काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या आहेत. पण २३५३ ग्रामपंचायतींमध्ये एकूण २०,५७२ जागा आहेत. या सर्व २३५३ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचीही थेट निवडणूक झाली. याशिवाय २०६८ ग्रामपंचायतींमधील रिक्त २९५० जागांसाठी पोटनिवडणूकही झाली. रिक्त असलेल्या १३० सरपंचपदासाठीही पोटनिवडणूक होत आहे. अशा पद्धतीने सुमारे २५ हजार जागांसाठी रविवारी मतदान झाले. एकूण ७४ टक्के मतदान झाले असून १८५ निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत.

controversy over distribution of burkha by shinde group
शिंदे गटाकडून बुरखावाटप केल्याने वाद
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Ajit Pawar, NCP, Vidarbha, Ajit Pawar and Vidarbha,
Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विदर्भात धुसफूस, ‘हे’ आहे कारण
Amit Shah Mumbai, Amit shah news,
Amit Shah Mumbai : महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको! अमित शहा यांची सूचना; पक्षाच्या निवडणूक तयारीचा आढावा
Bhagyashree Atram daughter of Minister Dharma Rao Baba Atram join sharad pawar NCP
गडचिरोली : राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच मुलगी विरुद्ध वडील राजकीय संघर्ष; आत्राम कुटुंबातील फुटीमुळे…
Rajendra Gavit, Palghar Assembly Constituency,
राजेंद्र गावित पालघरसाठी आग्रही
bjp leader harshvardhan patil marathi news
हर्षवर्धन पाटील यांची महायुतीतील नेत्यांवर नाराजी, इंदापूरमधून निवडणूक लढविण्यावर ठाम; लवकरच निर्णय
Opposition of Mahavikas Aghadi to development works in Naina area
नैना क्षेत्रातील विकसकामांना महाविकास आघाडीचा विरोध

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे अजित पवार गटातील नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. तर, राजकीय नेतेमंडळींसाठी ग्रामपंचायतींच्या निवडणुका या महत्त्वाच्या आहेत. ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षीय पातळीवर किंवा पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नाहीत. राजकीय पक्ष आपापली पॅनेल तयार करून रिंगणात उतरतात. तरीही सर्वाधिक जागा आम्हीच जिंकल्या असा दावा करण्याची सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागलेली असते. यंदाही हेच अनुभवास येण्याची शक्यता आहे. येत्या काही तासांतच निकाल हाती येण्याची शक्यता आहे.