अलिबाग – रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमावारी लागले. या निवडणूकीत सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकत शिवसेनेना शिंदे गटाने आपले वर्चस्व राखले. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जागा जिंकल्या, भाजपच्या चांगल्या जागा जिंकत प्रस्तापितांना धक्के दिले. तर शेकाप आणि काँग्रेसची जिल्ह्यात मोठी पिछेहाट झाल्याचे दिसून आले. पक्षफुटीनंतरही शिवसेना उध्दव ठाकरे गटाने आपले अस्तित्व कायम असल्याचे दाखवून दिले..
जिल्हयातील २१० ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्या होत्या . त्यापैकी ३३ ठिकाणी सरपंच तर सदस्यपदाच्या ५६४ जागांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे जिल्हयातील १७७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी व सदस्यपदाच्या १२६४ जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली . सरपंचपदासाठी ४८५ तर सदस्यपदासाठी ३ हजार ३९५ उमेदवार निवडणुक रिंगणात होते. जिल्ह्यात सरासरी ७८.४६ टक्के मतदान झाले होते.
हेही वाचा >>>“मराठा आरक्षणाला विरोध नाही पण…”, छगन भुजबळ यांचं वक्तव्य चर्चेत
सोमवारी या सर्व ग्रामपंचायतींचे निकाल जाहिर झाले. मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पडली. शिवसेना शिंदे गटाचे सर्वाधिक ६४ सरपंच निवडून आले. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ५०, शेकापचे ३२, भाजपचे २६, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे २०, काँग्रेसचे ०३, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ०३, तर १२ ठिकाणी अपक्ष अथवा आघाडीचे सरपंच निवडून आले.