सांगली : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात आणि आबालवृद्धांच्या आनंदात शनिवारी गणेशाचे मोठ्या थाटात आगमन झाले. दुपारपर्यंत घरगुती गणेशाची प्रतिष्ठापना केल्यानंतर सायंकाळपासून ध्वनी मर्यादेचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या ध्वनिक्षेपकांच्या भिंती, ढोल-ताशांच्या निनादात सार्वजनिक मंडळाच्या स्वागत मिरवणुका सुरू झाल्या. सांगली संस्थानच्या गणेशाची विधिवत राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली.

यंदा पाऊसकाळ चांगला असल्याने गणेशोत्सव थाटात साजरा होत असून गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. सांगली शहरातील पुष्पराज चौक, गणपती पेठ, कुंभार गल्ली, विश्रामबाग गणेश मंदिर आदी ठिकाणी गणेशमूर्तीचे स्टॉल लावण्यात आले होते. सकाळपासून श्रींची मूर्ती घरी नेण्यासाठी भाविकांनी याठिकाणी गर्दी केली होती. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात गणरायाचे घरोघरी आगमन झाले.
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थांनच्या सरकारी गणपती उत्सवाला आजपासून मोठ्या भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे. सकाळी गणेश मंदिरातून दरबार हॉलपर्यंत सरकारी गणपतीच्या श्रीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर राजवाडा परिसरातील दरबार हॉल येथे सरकारी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपती संस्थानचे युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या हस्ते सरकारी गणपतीची प्रतिष्ठापनेची आरती करण्यात आली. यावेळी श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन, राणीसाहेब राजलक्ष्मी पटवर्धन आणि राजकन्या पौर्णिमा पटवर्धन, व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांची विशेष उपस्थिती होती. आजपासून सरकारी संस्थानच्या गणपती उत्सवाला भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे. या पाच दिवसाच्या उत्सवामध्ये संगीतमय कार्यक्रम, पानसुपारी आणि विसर्जन मिरवणूक असे कार्यक्रम आहेत.

Laxman Hake, OBC, OBC community,
कोणाला पाडायचे – विजयी करायचे ओबीसी समाजाचे ठरले – लक्ष्मण हाके
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Jarange agitation, Mahavikas Aghadi,
जरांगे यांचे आंदोलन महाविकास आघाडीच्या फायद्यासाठी – राजेंद्र राऊत
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Eknath shinde ajit pawar (2)
ShivSena vs NCP : “आजच्या घटनेमुळे शिंदे गट बदनाम झालाय”, अजित पवार गटाची टीका; महायुतीत वादाची ठिणगी?
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Bail Pola festival in full swing at Kulaswamini Tuljabhavani Temple
कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात बैलपोळा सण उत्साहात

हेही वाचा – अहमदनगर : भंडारदरा पाणलोटातील घाटघरला आजपर्यंत पडला ५ हजार ३८ मिमी पाऊस

हेही वाचा – Puja Khedkar : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर सरकारी सेवेतून बरखास्त; केंद्र सरकारची मोठी कारवाई

दुपारपर्यंत घरगुती गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर सार्वजनिक मंडळाच्या गणेश आगमन मिरवणुकांना जोषात सुरुवात झाली. सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरांत ७५० हून अधिक सार्वजनिक मंडळांची यावेळी प्रतिष्ठापना होत आहे. मिरवणुकीमध्ये ढोल-ताशांसह बेंजोंचा समावेश तर होताच पण याचबरोबर ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या ध्वनिक्षेपकांच्या भिंतींचाही वापर करण्यात आला. श्रींच्या स्वागत मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. गणेश उत्सवात होणारी गर्दी लक्षात घेऊन शहरातील काही मार्ग पोलिसांंनी वाहतुकीसाठी बंद केले होते. तर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.