लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : मराठा आरक्षण मागणीसाठी आणि अंतरवली सराटी येथे आंदोलकाऔवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी रविवारी सांगलीत भव्य मोर्चा काढण्यात आला. मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला सर्व राजकीय पक्ष, संघटनांनी पाठिंबा देत सहभाग नोंदवला.

आणखी वाचा-राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेची निवडणूक महायुतीत लढणार? अजित पवार म्हणाले…

विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील पुतळा व राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करुन मोर्चाला प्रारंभ झाला. हजारोंचा समुदाय मोर्चात सहभागी झाला असून दोन किलोमीटरच्या मार्गावर विविध संस्था, संघटनांच्यावतीने अल्पोपहार, पाणी व्यवस्था करण्यात आली. राममंदिर चौकामध्ये मोर्चाच्यावतीने एका तरुणीसह पाच युवकांनी आरक्षण मागणीबाबत भाषण केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाचे वाचन करण्यात आले.

Story img Loader