वाई : अल्पवयीन नातीवर बलात्कार आणि ती गर्भवती राहिल्यावर नवजात बालकाला मारून टाकण्याची घटना बरड (ता. फलटण) येथे उघडकीस आली आहे. या घटनेने सर्वत्र  खळबळ उडाली आहे.

संशयित आजोबांनी जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत नातीवर शेतात अत्याचार केले. याबाबत कुठेही बोलल्यास मारून टाकण्याची धमकीही त्यांनी दिली. यामुळे तिने याबद्दल कोणालाही सांगितले नाही. मात्र या घटनेनंतर ती गरोदर झाली होती. दोन दिवसांपूर्वी तिने एका बाळाला जन्म दिला. या बाळामुळे आपली काळी कृत्ये लोकांना समजतील या भीतीने आरोपीने ते बाळही मारून टाकले आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. बोमले करत आहेत. संशयिताला अटक करण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.