दोन दिवसांपूर्वी जिल्ह्य़ात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्य़ात लावणी झालेली भातशेती आणि खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे सुमारे पाच कोटी रुपये नुकसान झाले आहे. जिल्ह्य़ातील नऊ तालुक्यांपैकी चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी आणि राजापूर या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे घरे, गोठे, दुकानांच्या खासगी मालमत्तेचे मिळून सुमारे एक कोटी रुपये, तर रस्ते, पूल यासारख्या सार्वजनिक मालमत्तेचे सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे या तालुक्यांमधील नदीकिनारी असलेल्या भातशेतीमध्ये पुराचे पाणी घुसल्याने २३२ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. या व्यतिरिक्त या प्रलयामध्ये तीनजणांचे बळी गेले आहेत. रत्नागिरी तालुक्यात काजळी नदीला पुर आल्यामुळे हरचेरी, चांदेराई, पोमेंडी, सोमेश्वर इत्यादी गावांना सर्वाधिक फटका बसला. चिपळूण तालुक्यात वीर, कालुस्ते, वेहळे, खेरशेत इत्यादी गावांमध्ये घर, रस्ते, विहिरींचे नुकसान झाले आहे. तसेच या तालुक्यात पूल, साकव, कॉजवे इत्यादी सार्वजनिक मालमत्तेचे सर्वाधिक सुमारे अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. संगमेश्वर तालुक्यात सुमारे ३५ लाख रुपयांच्या मालमत्तेची हानी झाली आहे. पावसामुळे जिल्’ाातील १३५ गावांमधील २३२ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ११६४ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. जिल्’ाातील या सर्व ठिकाणच्या मालमत्तांच्या हानीचे पंचनामे पूर्ण झाले असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. जिल्’ााचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सर्व तालुक्यांमध्ये दौरा करुन या नुकसानीची पाहणी केली आणि पुढील कार्यवाहीचे आदेश दिले.
पावसामुळे जिल्ह्य़ात भातशेतीचे मोठे नुकसान; पाच कोटी रुपयांची मालमत्ता हानी
दोन दिवसांपूर्वी जिल्ह्य़ात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्य़ात लावणी झालेली भातशेती आणि खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे सुमारे पाच कोटी रुपये नुकसान झाले आहे. जिल्ह्य़ातील नऊ तालुक्यांपैकी चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी आणि राजापूर या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे घरे, गोठे, दुकानांच्या खासगी मालमत्तेचे मिळून सुमारे एक कोटी रुपये, तर रस्ते, पूल यासारख्या सार्वजनिक मालमत्तेचे सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
First published on: 06-07-2013 at 03:44 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Great loss of paddy by rain