माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानतर्फे शहरातील माध्यमिक शाळांतील १२ हजार विद्यार्थी, शिक्षक व संगीतप्रेमींकडून ‘एक सूर एक ताल’ असे शब्दसुरांनी अभिवादन करण्यात आले. कृष्णा- कोयनेच्या प्रीतिसंगमावर हा कार्यक्रम पार पडला.
प्रज्ञेस प्रेरणेकरिता, यशवंत यशाची गाथा, वंदे मातरम, इतनी शक्ती हमें देना दाता, जन गण मन या गीतांनी समाधी परिसर बहरला होता. या वेळी आमदार बाळासाहेब पाटील, नगराध्यक्षा प्रा. उमा हिंगमिरे, कराड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मुकुंदराव कुलकर्णी, कराड पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत रोडे उपस्थित होते.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा