हर्षद कशाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अलिबाग : पेणच्या गणेशमूर्ती व्यवसायाचे विस्कळीत स्वरूप दूर करण्यासाठी केंद्र सरकारची प्रस्तावित समूह विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) योजना रखडली आहे. पेण मूर्तिकारांकडून योजनेला अपेक्षित सहकार्य मि़ळत नसल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भवितव्य अडचणीत आले आहे. केंद्र सरकारच्या सुक्ष्म आणि लघु समूह विकास र्कायक्रमांर्तगत पेण येथील गणपती कारागीरांसाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेला केंद्र सरकारने २००९ साली तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. पेणच्या गणेशमूर्ती व्यवसायाचे विस्कळीत स्वरूप दूर करून या व्यवसायाला एकत्रित (ऑर्गनाईज) स्वरूप देणे हा या योजनेमागचा उद्देश होता. शिवाय पेणच्या गणेशमूर्तीचे जागतिक पातळीवर ब्रॅँण्डिंग करण्याचे प्रयत्न या योजनेतून केले जाणार होते. पण मूर्तिकारांकडून मिळणाऱ्या अत्यल्प प्रतिसादामुळे ही योजना अडचणीत सापडली आहे.

राज्यातील १० ग्रामोद्योगांची गुणवत्ता विकसित करण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम योजना राबविण्यात आली. यात पेणच्या गणेशमूर्ती व्यवसायाचाही समावेश होता. या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योजगता विकास केंद्राने पेण तालुक्यातील पेण मूर्तिकलेचा निदान उपयोगी अभ्यास अहवाल तयार केला. पेण मधील २५० ते ३०० गणपती मूर्तिकारांना योजनेची माहिती सांगून अहवाल दाखवण्यात आला. पेणच्या गणपती मूर्तीची गुणवत्ता वाढावी, तसेच मूर्तीना ट्रेड मार्क मिळावा म्हणून प्रयत्न देखील सुरू झाले. क्षमतावृद्धी कार्यक्रमांतर्गत पेणच्या मुर्तिकारांना तांत्रिक आणि उद्योजकता प्रशिक्षणही देण्यात आले. या योजने आंतर्गत देशभरातील यशस्वी झालेल्या क्लस्टरना भेट देऊन पहाणी करण्याचा उपक्रमही राबविला गेला. केरळ मधे जाऊन मुर्तीकार संघटनांच्या प्रतिनिधीनी मार्गदर्शनही घेतले. त्यांनतरच्या टप्प्यात पेण मुर्तीकार संघटनांना स्वत:ची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करण्यास सांगण्यात आले. पण पेणच्या मुर्तीकारांनी याकडे दुर्लक्ष केल आणि महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भवितव्य अडचणीत आले.

या महत्वाकांक्षी योजनेच्या पहील्या टप्यातील प्रशिक्षण कार्यक्रम पुर्ण झालाय. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात कंपनीची स्थापना करणे, कपंनीसाठी जागा विकत घेणे आणि त्यानंतर सामाईक सुविधा केंद्रांची उभारणी करणे गरजेचे आहे. यासाठी कंपनीमधील भागीदारांनी १० टक्के निधी उभा करायचा आहे. तर उर्वरीत ९० टक्के निधी केंद्र सरकर देणार आहे. बँक ऑफ इंडिडीयाने या प्रकल्पासाठी लागणाऱ्या १० टक्के रकमेसाठी कर्ज पुरवठा करण्याचे तत्वतङ्म मान्य केल. मात्र तरीही पेणच्या मूर्तिकारांनी या प्रकल्पात फारसे स्वारस्य दाखवलेल नाही. मुर्तीकारांनी अद्यााप कंपनी स्थापन केली नाही अथवा प्रकल्पासाठी असणारी जागा देखील निवडलेली नाही.

सामाईक सुविधा केंद्र सुरु झाल्यास पेणच्या गणेश मुर्तीचे सामाईक उत्पादन सुरु होऊ शकणार आहे. शिवाय गुणवत्ता क्रेंद्र बिजनेस डेव्हलपमेंट सेंटर, तांत्रीक प्रशिक्षण केंद्र या सर्व सुविधा एकाच छत्राखाली येऊ शकणार आहे. केंद्र सरकारच्या समुह विकास योजना( क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम) आंतर्गत राज्यभरातून निवडण्यात आलेले इतर नऊ प्रकल्प मार्गी लागले आहेत. यात रत्नागिरीच्या आंबा प्रोसेसींग सिधूदूर्गातील काजू प्रक्रिया प्रकल्प, तर कोल्हापुर मधील चर्मकला आणि चांदीकलेचा समावेश आहे. राज्यात क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम आंतर्गत रखडणारा पेणच्या गणेश मुर्तीकला हा एकमेव प्रकल्प ठरला आहे.

  •   पेण शहरात गणेशमुर्ती बनवणारे १५० मुर्तिकार कार्यरत आहे.
  • तर जोहे, हमरापुर, वडखळ आणि कामार्ले परिसरात गणेश मूर्ती बनवणाऱ्या ४५० हून अधिक कार्यशाळा आहेत. यातून दरवर्षी जवळपास २५ ते ३० लाख गणेश मूर्त्यां तयार केल्या जातात.
  • ज्या देशाविदेशातही पाठवल्या जातात. या मूर्तिकला व्यवसायातून दरवर्षी साधारणपणे ५० कोटींची उलाढाल होत आहे.
  •   मात्र विस्कळीत स्वरूपात असलल्याने या गणेश मूर्तिव्यवसायाचे ब्रँडिंग होऊ शकलेले नाही.

पेणमधील गणपती कारखान्यासाठी केंद्र सरकारची समुह विकास योजना तयार केली जात होती. त्याचा प्रकल्प अहवाल  तयार करण्यात आला होता.  काही तंत्रिक अडचणीमुळे हा प्रकल्प रखडला. असे असले तरी पेण येथील गणपती कारखानदारांची इच्छा व्यक्त केली तर त्यांच्यासाठी   क्लस्टर  योजना राबविण्यासाठी पुन्हा प्रयत्न करू.  

– गु. श. हरळय्या, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र