साताऱ्यात माल वाहतूक रेल्वेला धडकून म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यात ९ म्हशी जखमी झाल्या. सातारा महागाव परिसरात ही घटना घडली. पुणे मिरज रेल्वे मालगाडी समोर आल्याने म्हशींचा अपघात होऊन रेल्वेच्या धडकेत म्हशीचा मृत्यू झाला.

पुणे मिरज रेल्वे मालगाडी मिरजकडे जात असताना सातारा रेल्वे स्टेशनजवळ महागाव गावच्या हद्दीतून मालगाडी जात होती. तेव्हा जवळून जाणाऱ्या म्हशींचा कळप रेल्वे मार्गावर आला आणि त्या म्हशींना रेल्वेची धडक बसली. यावेळी दोन म्हशी अडकल्या. त्यात एक म्हैस जागेवरच ठार झाली, तर अन्य ९ म्हशी किरकोळ जखमी झाल्या. रेल्वेच्या चाकांमध्ये म्हशी अडकल्याने माल वाहतूक करणारी रेल्वे जागेवर अडकली.

Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
Terrifying Railway accident of railway employee due to train driver at barauni junction in bihar video viral
बापरे! चालकाच्या चुकीमुळे घडला मोठा अनर्थ, ट्रेन सुरू करताच झाला रेल्वे कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडल? पाहा VIDEO
biker dies due to speeding bike falls from bridge
भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून कोसळली, दुचाकीस्वाराचा मृत्यू

“रेल्वे चालकाने प्रसंगवधान दाखवल्यामुळे ९ म्हशींचा जीव वाचला”

रेल्वे चालकाने प्रसंगवधान दाखवल्यामुळे ९ म्हशींचा जीव वाचला. मोठी क्रेन आणून ठार झालेली म्हैस रेल्वे मार्गावरून बाजूला करून रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्ग मोकळा केला. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

हेही वाचा : मनमाडजवळ किसान एक्सप्रेसचे २ डबे रुळावरून घसरले, पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत

दरम्यान, दुसऱ्या घटनेत लोणंद-निरा दरम्यान पुणे ते मिरज रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेने लोणंद जवळील बाळू पाटलाची वाडी हद्दीत २ वानरांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक वानर गंभीररीत्या जखमी झाले.