कराड : पाटण तालुक्यातील प्रसिद्ध ओझर्डे धबधबा स्थळावरील पर्यटनाला मद्याधुंद हुल्लडबाजांमुळे ग्रहण लागले आहे. सध्या ओझर्डे धबधबा पर्यटकांसाठी बंद असताना त्याकडे जाणारा मुख्य दरवाजा उघडण्याच्या कारणावरून तेथील चौकीदाराला कराडमधील नऊ मद्याधुंद पर्यटकांनी जबर मारहाण केल्याची खळबळजनक घटना काल, सोमवारी रात्री घडली आहे. बेदम मारहाणीत वनमजूर विजय शेलार (रा. नवजा, ता. पाटण) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्या फिर्यादीवरून कोयना पोलिसांनी नऊ पर्यटकांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी…”, मुख्यमंत्री शिंदेंची महाविकास आघाडीवर टीका

पोलिसांची माहिती अशी की, आफताब नायकवडी, रिहान डांगे, अजमेर मांगलेकर, वसंत माने, मुद्दसर शेख, मुमिल्ल शेख, साद मुलाणी, हुजेफा शेख, अन्वर मुल्ला (सर्व रा. कराड) अशी अटक करण्यात आलेल्या नऊ जणांची नावे आहेत. सध्या ओझर्डे धबधबा बघण्यासाठी पर्यटकांना बंदी असतानाही सोमवारी (दि. ८ जुलै) रात्री ओझर्डे धबधबा पाहण्यासाठी वनविभागाने बंद केलेल्या धबधब्याकडे जाणारा मुख्य दरवाजा उघडण्याच्या कारणावरून त्याठिकाणी कर्तव्यास असलेले वन्यजीव विभागाचे वनमजूर विजय शेलार यांना मद्याधुंद अवस्थेत आलेल्या आणि सध्या अटकेत असलेल्या वरील नऊ जणांनी जबर मारहाण केली. त्यात वनमजूर शेलार गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guard at ozarde waterfall brutally beaten up by nine drunken tourists from karad zws
Show comments