जिल्हानिर्मितीनंतर सुरू करावयाची ११ शासकीय कार्यालये हिंगोलीमध्ये अजूनही सुरू झालेली नाहीत. सोमवारी नव्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत यावर काय निर्णय होतात, याकडे लक्ष लागले आहे. आघाडीच्या कालखंडात पालकमंत्र्यांची भूमिका झेंडावंदनापुरतीच मर्यादित होती. मात्र नवे पालकमंत्री दिलीप कांबळे जिल्ह्य़ातील प्रश्नांकडे किती लक्ष देतात, हे त्यांच्या दौऱ्यानंतरच स्पष्ट होईल, असे सरकारी अधिकारी सांगत आहेत.
जिल्हय़ाच्या पालकमंत्री म्हणून वर्षां गायकवाड यांचा कार्यकाळ म्हणजे शासकीय झेंडा वंदन व जिल्हा वार्षकि नियोजनाची बठक एवढाच. अपवादात्मक एखाद्या कार्यक्रमाला त्या हजेरी लावत. त्यामुळे नवीन काही मिळणे दूरच. मंजूर असलेली जिल्हास्तरीय ११ कार्यालये अद्याप िहगोलीत सुरू झालेली नाहीत. सत्ता बदलल्याने नवे पालकमंत्री जिल्ह्य़ाच्या प्रश्नाकडे कसे पाहतात, याची उत्सुकता लागली आहे.
जिल्हय़ात कमी पाऊस पडल्याने ७०७ गावांतील पीक आणेवारी ५० टक्क्य़ांपेक्षा कमी आली. खरीप पीक हातून गेल्याने निराशेपोटी ३५च्यावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम पालकमंत्री करतील काय, असा प्रश्न विचारला जात आहे. सोमवारी त्यांच्या उपस्थितीत विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

Story img Loader