Maharashtra Guardian Minister List : महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर अखेर आज (१८ जानेवारी) पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहरचं पालकमंत्रिपद असणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्हा आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे.

मंत्री धनंजय मुंडेंना धक्का

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर बीड जिल्ह्यात चांगलंच राजकारण तापलं होतं. यावरून धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद देण्यास बीड जिल्ह्यातील आमदारांनी विरोध केला होता. त्यानंतर आता बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांना या पालकमंत्रिपदाच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलेलं नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.

Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
dcm eknath shinde loksatta news
“सर्वसामान्यांसाठी राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला सांगितलं तर व्हाल का? मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पक्ष जे सांगेल…”
CM Devendra Fadnavis Nagpur Interview
Devendra Fadnavis : कठोर राजकारणी कोण मोदी की अमित शाह? देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं?
Bigg Boss 18 Bigg Boss angry after Vivian dsena can chum darang refused to accept the ticket to final
Bigg Boss 18: विवियन डिसेना, चुम दरांगच्या ‘या’ निर्णयामुळे भडकले ‘बिग बॉस’; सर्व सदस्यांना दिल्या दोन शिक्षा
Bigg Boss 18 Shrutika Arjun has been Evicted from salman khan show in Mid week eviction
Bigg Boss 18: महाअंतिम सोहळ्याच्या १० दिवसांआधी झालं ‘मिड वीक एविक्शन’, कमी मतांमुळे ‘हा’ सदस्य घराबाहेर
Maharashtra News Live Updates in Marathi
Maharashtra News Updates : महापालिका निवडणूक मनसे महायुतीबरोबर लढवणार का? मनसे नेत्याचं मोठं विधान

रायगडच्या पालकमंत्रिपदी आदिती तटकरे

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटात मोठी रस्सीखेच सुरु होती. भरत गोगावले यांनी रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळावं, यासाठी आग्रही होते. याबाबत त्यांनी अनेकदा अपेक्षाही बोलून दाखवल्या होत्या. मात्र, रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आली आहे.

कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद कोणाकडे? वाचा यादी

क्र.जिल्हा पालकमंत्रिपद
गडचिरोलीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सह.आशिष जयस्वाल
ठाणे, मुंबई शहरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे</td>
पुणे, बीडउपमुख्यमंत्री अजित पवार
नागपूर, अमरावती</td>चंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगरराधाकृष्ण विखे पाटील
नाशिकगिरीश महाजन
वाशिम हसन मुश्रीफ
सांगली चंद्रकांत पाटील
जळगाव गुलाबराव पाटील
१०यवतमाळ संजय राठोड
११मुंबई उपनगर आशिष शेलार व सह.मंगलप्रभात लोढा
१२रत्नागिरी उदय सामंत
१३धुळे जयकुमार रावल
१४जालना पंकजा मुंडे
१५नांदेड अतुल सावे
१६चंद्रपूर अशोक ऊईके
१७सातारा शंभुराजे देसाई
१८रायगड अदिती तटकरे
१९सिंधुदुर्गनितेश राणे
२०लातूर शिवेंद्रसिंहराजे भोसले
२१नंदुरबार माणिकराव कोकाटे
२२सोलापूर जयकुमार गोरे
२३हिंगोली नरहरी झिरवाळ
२४भंडारा संजय सावकारे
२५छत्रपती संभाजीनगरसंजय शिरसाट
२६धाराशीव प्रताप सरनाईक
२७बुलढाणा मकरंद जाधव
२८अकोला आकाश फुंडकर
२९गोंदिया बाबासाहेब पाटील
३०कोल्हापूर प्रकाश आबिटकर, सह, माधुरी मिसाळ
३१वर्धा पंकज भोयर
३२परभणी मेघना बोर्डीकर
३३पालघर गणेश नाईक

Story img Loader