रत्नागिरीतील दुग्धव्यवसायिक बठकीविनाच परतु
पालकमंत्र्यांच्या वेळापत्रकात अचानक बदल झाल्याने रत्नागिरीतील दुग्धव्यवसायिकांच्या जिल्हास्तरीय बठकीला नुकतेच गरनियोजनाचे गालबोट लागले. जिल्ह्य़ाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दुग्धव्यवसायिकांसह जिल्हापरिषदेतील लोकप्रतिनिधींनाही बठकीविनाच परतावे लागले. जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या समन्वयाअभावी ही परिस्थिती उद्भवल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच दुग्धव्यवसायिकांची जिल्हास्तरीय बठक आयोजित केली होती. ही बठक भोजनानंतर दुपारी चार वाजता होणार होती. या बठकीत जिल्ह्याच्या अनेक भागातील दुग्धव्यवसायिकांनी आपापल्या समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडण्याची तयारी केली होती. पण पालकमंत्र्यांनी नियोजित वेळ अचानक बदलून ही बठक दुपारी दोन वाजता घेतली आणि जिल्ह्य़ाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दुग्धव्यवसायिकांना चच्रेविनाच हात हलवत परतावे लागले. विशेष म्हणजे हे बदललेले नियोजन जिल्हापरिषदेतील काही लोकप्रतिनिधींनाही कळवण्यात न आल्याने त्यांनाही बठकीविनाच परतावे लागले.
मुळात श्री. वायकर यांचे सकाळच्या सत्रातील कार्यक्रम वेळेच्या आधीच संपणार असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी ही बठक दुपारी चारऐवजी दोन वाजता घ्यावी, असे जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयाला सूचित केले होते. मात्र जिल्ह्य़ाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या दुग्धव्यवसायिकांसाठी असा अचानकचा बदल योग्य ठरणार नाही, याकडे पालकमंत्र्यांचे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले नाहीच, पण बदललेल्या वेळेचा संदेशही त्यांनी दुग्धव्यवसायिकांपर्यत पोचवला नाही. त्यामुळे अनेकांना रत्नागिरीत जाऊनही बठकीला उपस्थितच राहता आले नाही.
दरम्यान, जिल्’ााची भौगोलिक रचना लक्षात घेता अनेक भागातील दुग्धव्यवसायिकांना जिल्ह्य़ाच्या ठिकाणी जाण्यास खूप वेळ लागतो. त्यामुळे दूधव्यवसाय सांभाळून अशा जिल्ह्य़ाच्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांना, बठकांना उपस्थित राहणे, अनेकांना अशक्य ठरते. अशा परिस्थितीत पालकमंत्र्यांनी बठकीची वेळ अचानक बदलल्याने अनेक भागातून रत्नागिरीत पोचलेल्या दुग्धव्यवसायिकांच्या नामुष्कीत आणखी भर पडली आहे, अशी खंत दापोलीतून या बठकीला गेलेले पालगड दूध संकलन संस्थेचे हेमंत ओक यांनी व्यक्त केली.
अशा बठका विभागवार घेतल्यास सर्वच दुग्धव्यवसायिकांना सोयीस्कर होतील, अशी अपेक्षाही त्यांनी दै. ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.