राज्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक जिल्ह्यात परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं चित्र आहे. वर्ध्यातही करोनाचा फैलाव होत आहे. असं असलं तरी जिल्ह्यात पर्याप्त प्रमाणात रुग्णखाटा उपलब्ध आहेत. मात्र तरीही रुग्णांना खाटा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहे. पालकमंत्री सुनील केदार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. रुग्णालयातील खाटांची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी संपर्क कक्ष स्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सावंगी, सेवाग्राम रूग्णालय, जिल्हा सामान्य रूग्णालय, आर्वी आणि हिंगणघाटचे उपजिल्हा रूग्णालय येथे एकूण १ हजार १४० खाटा उपलब्ध आहेत. सध्या ६९५ रूग्णांवर उपचार सुरू असून ४९५ खाटा रिक्त आहे. १ हजार १४० खाटांपैकी १ हजार २० ऑक्सिजन खाटा आहेत. तसेच ६८ व्हेंटीलेटर कार्यरत आहे. मात्र ही माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याचं समोर आलं आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तात्काळ संपर्क कक्ष स्थापन करावा असं पालकमंत्री सुनील केदार यांनी सांगितलं आहे.

घटनास्थळी न जाताच उपसमितीकडून चौकशी!

तसेच ऑक्सिजन खाटांसाठी १ हजार ३७८ क्यूबीक मीटरप्रमाणे ऑक्सिजन पूरवठा करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी सांगितले. त्यावर सेवाग्राम येथे द्रवरूप ऑक्सिजनसाठी नवी टँक सुरू करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. शासनाकडून ५ हजार ५८० रेमडिसिवीर इंजेक्शन प्राप्त झाले असून ६ हजार ६४४ स्थानिक पातळीवर खरेदी करण्यात आले. एकूण १२ हजार २२४ इंजेक्शनपैकी १० हजार ६१३ इंजेक्शनचा वापर झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘निवृत्तीवेतनाची माहिती न देता पोटगी मिळवणे चुकीचे’

जिल्ह्याला देण्यात आलेल्या कोविशिल्ड लस संपल्या असून कोव्हॅक्सिन लस उपलब्ध आहेत. कोव्हॅक्सिन लसीचासुध्दा केवळ दुसरा डोस सुरू राहणार आहे.

Story img Loader