Raj Thackeray Gudi Padwa Sabha : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची आज २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

Live Updates
21:02 (IST) 2 Apr 2022
स्वाभिमान गहाण टाकू नका, राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

"जेव्हा माणूस स्वाभिमान गहाण टाकतो, तेव्हा उरतात ती फक्त प्रेतं, असं म्हणत राज ठाकरेंनी जनतेला स्वाभिमान जागा ठेवत यांना यांची जागा दाखवा," असं राज ठाकरे म्हणाले.

20:57 (IST) 2 Apr 2022
"अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं ना, मग भोगा"; राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका

"माझ्या कुटुंबावर येणार असेल तर मला अटक करा असं मुख्यमंत्री म्हणालेत, मग पहिल्यांदा त्यांना सांगा की मुंबई महानगर पालिकेत ये जा करू नका... मला ईडीची नोटीस आली मी गेलो ना चौकशीला, अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं ना, मग भोगा. हे सगळं २०१९ चं आहे, या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका," असं आवाहन राज ठाकरेंनी जनतेला केलं.

20:55 (IST) 2 Apr 2022
मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे - राज ठाकरे

"प्रार्थनेला विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा," असं राज ठाकरे म्हणाले.

20:53 (IST) 2 Apr 2022
"झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांवर धाडी टाका"; राज ठाकरेंची मोदींकडे मागणी

"माझी पंतप्रधानांना विनंती आहे की झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांवर धाडी टाका. पोलिसांना देखील माहिती आहे. तुम्हाला पाकिस्तानची गरज नाही, या झोपडपट्टीत इतक्या गोष्टी हाती लागतील," असं राज ठाकरे म्हणाले.

20:48 (IST) 2 Apr 2022
आमदारांना कसली घरं वाटताय? राज ठाकरेंची टीका

"आमदारांना मुंबईत घरं द्या आणि त्यांची फार्महाऊस आपल्या नावावर करून घ्या, असं राज ठाकरे म्हणाले. आमच्या आमदाराने सर्वात आधी त्यांना विरोध केला. आमदारांना मिळणाऱ्या पेंशनलाही त्यांनी विरोध केला. ते लोकांसाठी काम करत आहेत, उपकार करत नाही, तसेच मुख्यमंत्र्यांकडे घर कोणत्या आमदाराने मागितलं होतं" असं राज ठाकरे म्हणाले.

20:44 (IST) 2 Apr 2022
काम नाही केलं, त्याला सत्तेवर बसवलं; राज ठाकरेंचा जनतेला सवाल

"ज्यांनी काम केलं त्यांना बाजूला सारून काम न करणाऱ्यांना तुम्ही सत्तेवर बसवलं, मग काम करून काय फायदा, लफंगेगिरी करणाऱ्यांना तुम्ही सत्तेत बसवत आहात," असा सवाल राज ठाकरेंनी जनतेला केला.

20:40 (IST) 2 Apr 2022
हिंदू म्हणून आपण कधी एक होणार? राज ठाकरेंचा सवाल

"जातीपातीच्या राजकारणात अडकून पडलेलो आपण हिंदू म्हणून कधी एकत्र येणार," असा सवाल राज ठाकरेंनी केला.

20:38 (IST) 2 Apr 2022
बाबासाहेब पुरंदरे हे सॉफ्ट टार्गेट होते - राज ठाकरे

"बाबासाहेब पुरंदरेंनी इतिहास लिहीला म्हणून त्यांना जातीवरून सॉफ्ट टार्गेट केलं गेलं. ते काही म्हणाले की ते ब्राम्हण आहेत, असं म्हणत त्यांच्यावर टीका व्हायची," असं राज ठाकरे म्हणाले.

20:36 (IST) 2 Apr 2022
राष्ट्रवादी काँग्रेसने दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवलं, राज ठाकरेंचा आरोप

१९९९ ला जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं. त्यापूर्वी जात ही अभिमान होती. मात्र राष्ट्रवादीच्या जन्मानंतर यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवलं. आम्ही जातीतून बाहेर पडणार नाही, तर मग आम्ही हिंदू कधी होणार, असं राज ठाकरे म्हणाले.

20:33 (IST) 2 Apr 2022
जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार - राज ठाकरे

आपण जर जातीपातीच्या राजकारणात अडकून पडलो असतील, तर कोणतं हिंदू आणि हिंदुत्व घेऊन बसता. राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.

20:32 (IST) 2 Apr 2022
उत्तर प्रदेशमध्ये विकास होतोय ही आनंदाची गोष्ट - राज ठाकरे

उत्तर प्रदेशमध्ये विकास होतोय हे कळल्यानंतर मला आनंद झाला. उत्तर प्रदेशच्या जनतेनी विकासाला मत दिलं आणि भाजपाने सत्ता स्थापन केली, असं राज ठाकरे म्हणाले.

20:29 (IST) 2 Apr 2022
महाराष्टात सगळीकडे बोंबाबोंब- राज ठाकरे

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूये, शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूये, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालाय, महाराष्ट्रात मराठी माणसाला नोकरीत प्राधान्य मिळायला हवं, असं राज ठाकरे म्हणाले.

20:27 (IST) 2 Apr 2022
"जो माणूस इतिहास विसरला, त्याच्या पायाखालचा भूगोल सटकला"

"जो माणूस इतिहास विसरला ना, त्याच्या पायाखालचा भूगोल सटकला, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. आमचे गृहमंत्री आणि मंत्री जेलमध्ये जातात, पण सरकार सत्तेत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र राज्यात होतंय," अशी टीका राज ठाकरेंनी केली.

20:23 (IST) 2 Apr 2022
छगन भुजबळ स्वातंत्रसेनानी नव्हते, राज ठाकरेंनी टीका

छगन भुजबळ तुरुंगात होते, तेव्हाची आठवण करत म्हणाले की तुरुंगात राहिलेल्या व्यक्तीला मी सर्वात आधी मंत्री केलं. गृहमंत्री तुरुंगात गेला, पण फरक पडत नाही. मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दाऊदशी संबंधांवरून नवाब मलिकांना अटक होते, साला तुम्ही काय उखाडणार, हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर होतंय, असं राज ठाकरे म्हणाले.

20:22 (IST) 2 Apr 2022
दाऊदशी संबंध असल्यावरून एक मंत्री जेलमध्ये जातो - राज ठाकरे

दाऊदशी संबंध असल्याचा आरोप एका मंत्र्यावर होतो आणि तो जेलमध्ये जातो, अशी टीका नवाब मलिक प्रकरणावरून राज ठाकरेंनी केली.

20:20 (IST) 2 Apr 2022
१०० कोटी वसुली प्रकरणावरून राज ठाकरे कडाडले

"मुंबईच्या पोलीस आयुक्ताला हटवलं जातं, आयुक्त गृहमंत्र्यांवर १०० कोटी वसुलीचे आरोप केले, गृहमंत्री जेलमध्ये जातो. पण तुम्ही सगळं विसरता, याचाच फायदा ते घेत आलेत," असं राज ठाकरे म्हणाले.

20:18 (IST) 2 Apr 2022
जिलेटीन प्रकरणावरून राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका

"अनिल अंबानींच्या घराबाहेर जिलेटीन ठेवणारा वझे जो एकेकाळी शिवसेनेत होता. हे सहज होतं का?, देशातल्या सर्वात मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर जिलेटीन भरलेली गाडी ठेवणं इतकं सोपंय का," असा सवाल राज ठाकरेंनी केला.

20:17 (IST) 2 Apr 2022
तुम्ही यांचे गुलाम आहात का? राज ठाकरेंचा जनतेला सवाल

यांच्यासाठी मतदान करता, यांचे गुलाम आहात का, यांनी कोणतीही खेळी करावी आणि तुम्ही ते बघत राहावं, कारण तुम्ही सगळ्या गोष्टी विसरता, असं राज ठाकरे जनतेला म्हणाले.

20:15 (IST) 2 Apr 2022
"सकाळी पाहतो काय, तर जोडा वेगळाच"; पहाटेच्या शपथविधीवरून राज ठाकरेंचा टोला

"एकदा सकाळी उठतो काय, पहातो काय, जोडा वेगळाच, सालं पळून कोणाबरोबर गेली, लग्न कोणा बरोबर केलं हेच समजेना," असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

20:14 (IST) 2 Apr 2022
...अन् राज ठाकरेंनी केली अजित पवारांची नक्कल

राज ठाकरेंनी अजित पवारांची नक्कल करत "मी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री..." असं म्हणत टीका केली.

20:12 (IST) 2 Apr 2022
२०१९मध्ये विधानसभेचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंना साक्षात्कार

निकाल लागल्यानंतर खास करून उद्धव ठाकरे यांना साक्षात्कार झाला. अडीच अडीच वर्षे ठरली होती, महाराष्ट्रात सभा झाल्या तेव्हा कधी बोलले नाहीत, इथे मुंबईत मोदी यांची सभा झाली तेव्हा व्यासपीठावर होतात तेव्हा बोलला नाहीत, मोदी - शहा हे दोन्ही बोलले मुख्यमंत्री फडणवीस होतील तेव्हा बोलले नाहीत. जेव्हा निकाल लागला तेव्हा सरकार आपल्यामुळे अडचणीत येऊ शकतं, मग काढलं... अडीच वर्षाचे काय झाले?, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

20:10 (IST) 2 Apr 2022
करोनामुळं सगळं विस्मृतीत गेलंय - राज ठाकरे

गेली दोन वर्ष करोनामुळे सर्व विस्मृतीत गेलंय. त्यामुळे करोनापूर्वी जे घडलं ते पण आपण विसरतो, तेच यांच्या फायद्याचं ठरतं, असं म्हणत राज ठाकरेंनी सत्ताधारी आणि विरोधकांवर टीका केली.

20:08 (IST) 2 Apr 2022
करोनामुळे पाडवा मेळावा झाला नाही - राज ठाकरे

"करोनामुळे गेली दोन वर्ष मनसेचा पाडवा मेळावा झाला नाही. दोन वर्षांनी यंदा निर्बंधमुक्त सण-उत्सव आणि पाडवा मेळावा साजरा करतोय. दोन वर्षांपासून बोललो नसल्याने मनात बरंच साचून आहे, शक्य होईल तितकं आज बोलेन," असं म्हणत राज ठाकरेंनी करोना काळात पोलिसांनी केलेल्या कामासाठी त्यांचं विशेष कौतुक केलं.

20:05 (IST) 2 Apr 2022
"जमलेल्या माझ्या बंधू आणि...."; राज ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात

"जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो", असं म्हणत राज ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात झाली आहे.

19:59 (IST) 2 Apr 2022
टायगर अभी जिंदा है...काळजी करण्याचं कारण नाही - बाळा नांदगावकर

"टायगर अभी जिंदा है...काळजी करण्याचं कारण नाही, राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या विकासासाठी एवढी वर्ष मेहनत घेतली आहे. जगाला हेवा वाटेल, असा महाराष्ट्र आम्हाला तयार करायचा आहे," असं बाळा नांदगावकर म्हणाले.

19:55 (IST) 2 Apr 2022
राज ठाकरे सभेच्या ठिकाणी पोहोचले

राज ठाकरे त्यांच्या निवासस्थानावरून सभास्थळी पोहोचले आहेत.

19:52 (IST) 2 Apr 2022
"...म्हणून महाराष्टाराचा विकास होत नाही"; बाळा नांदगावकर यांची टीका

"वेगवेगळ्या दिशा, वेगवेगळ्या विचारधारा, तिघांचं एकमेकांशी पटत नाही. आमदारांचं, मुख्यमंत्र्यांचं, कोणाचंच कोणाशी पटत नाही, त्यामुळे महाराष्ट्राचा विकास होत नाही," अशी टीका बाळा नांदगावकर यांनी महाविकास आघाडीवर केली.

19:46 (IST) 2 Apr 2022
"लोक 'मन की बात' ऐकतात की नाही..."; मनसेच्या राजू पाटलांचा टोला

"लोक 'मन की बात' ऐकतात की नाही माहित नाही, पण लोक राज ठाकरेंना नक्की ऐकतात", असं म्हणत मनसेच्या राजू पाटलांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला.

19:33 (IST) 2 Apr 2022
राज ठाकरे अयोध्या दौऱ्याची करणार घोषणा?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजच्या सभेत त्यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा करणार, असं म्हटलं जातंय.

19:18 (IST) 2 Apr 2022
शिवतीर्थावर ढोल-ताशांचा गजर

राज ठाकरे यांच्या सभेसाठी जमलेले मनसैनिक शिवतीर्थावर ढोल-ताशांचा गजरात उत्साह साजरा करत आहेत. राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी मनसैनिकांनी गर्दी केली आहे.

Story img Loader