चिपळूण – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये गुहागार विधानसभेच्या उमेदवाराचा समावेश नाही. त्यामुळे या जागेचा सस्पेन्स अजूनही वाढला आहे. ही जागा शिवसेना लढवणार की पुन्हा भाजपच्या वाट्याला येणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेना-भाजप युतीच्या जागा वाटपात गुहागर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे आहे. शिवसेना शिंदे गटाने ही जागा लढविण्याची घोषणा केली आहे. पक्षाच्या नेत्याकडून उमेदवाराचे नावही घोषित करण्यात आले आहे.  त्यानंतर शिवसेनेच्या उमेदवाराने मतदारसंघात भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर भाजपनेही या मतदारसंघात निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, मागील वर्षापासून भाजप गुहागरची जागा लढवण्याच्या तयारीत आहे. परंतु प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचा बलाढ्य उमेदवार असल्यामुळे येथे कोणाला उमेदवारी द्यायची यावरून शिवसेना भाजप यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. निवडणुकीचा कालावधी सुरू झाल्यानंतर नवीन नवीन चर्चा समोर येत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडून हट्टाने मागून घेतली होती. त्या बदल्यात रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा शिवसेनेला देण्याचे भाजपकडून मान्य करण्यात आले होते. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपैकी चार जागा शिवसेनेच्या वाट्याला भाजपने सोडल्याचे सांगितले जात आहे. मात्र भाजप स्थानिक कार्यकर्त्यांना गुहागरची जागा आपल्यालाच मिळेल अशी आशा आहे ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

हेही वाचा – अहिल्यानगर जिल्ह्यात अजित पवारांना मोठा धक्का! ‘या’ नेत्यांसह कार्यकर्त्यांचे राजीनामे

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची अद्याप घोषणा झालेली नाही. त्यामुळे गुहागरची उमेदवारी शिवसेनेच्या कोणत्या उमेदवाराला मिळेल हे अद्याप निश्चित नाही. भाजपच्या पहिल्या यादीत गुहागरचा समावेश नाही. त्यामुळे आता भाजपच्या दुसऱ्या यादीत आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पहिल्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुहागरची जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी अशी स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी आहे, त्यांनी वरिष्ठांपर्यंत ती पोहोचवली आहे. जागावाटपाची बोलणी वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. ते अंतिम टप्प्यात आहे, लवकरच गुहागरच्या जागेबाबत निर्णय होईल. असे डॉ. विनय नातू माजी आमदार गुहागर यांनी सांगितले.

हेही वाचा – भाजपा उमेदवारांची यादी जाहीर होताच पहिली बंडखोरी? श्रीगोंद्यात सुवर्णा पाचपुतेंचा निर्धार, “पक्षाला ताकद दाखवणार”

गुहागर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेची आहे. कार्यकर्त्यांना आधार देणारा आणि विरोधकांना भिडणारा खंबीर नेतृत्व आम्हाला मिळाला तर आम्ही गुहागरची जागा लढवू आणि जिंकून दाखवू. शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते त्यासाठी प्रयत्न करतील. असे दीपक कनगुटकर तालुकाध्यक्ष शिवसेना शिंदे गट यांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guhagar is not included in bjp first list suspense remains whether shivsena or bjp will contest the seat ssb