हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूरमध्ये असलेल्या भाजपच्या आमदारांचे गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी बौद्धिक घेतले. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री एकनाथ खडसे, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह भाजपचे सर्व मंत्री आणि विधानसभा व विधान परिषदेतील आमदार उपस्थित होते.
रेशिमाबागेतील स्मृतीभवनामध्ये झालेल्या या कार्यक्रमात भाजपचे ११० आमदार उपस्थित होते. डॉ. केशव हेडगेवार यांच्या पुतळ्याला वंदन केल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. आमदारांनी स्वतःचा परिचय करून दिल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रदेश संघटन मंत्री रविंद्र भुसारी यांनी भाजपमध्ये नव्याने आलेल्या सदस्यांना संघाचा परिचय करून दिला. त्याचबरोबर कार्यपद्धतीची माहिती दिली. यानंतर सुमारे दहा ते पंधरा मिनिटे भैय्याजी जोशी यांनी उपस्थित आमदारांचे बौद्धिक घेतले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये त्यांनी सामाजिक भान ठेवून आमदारांनी काम कसे केले पाहिजे, याबद्दल मार्गदर्शन केले.
संघाच्या भैय्याजी जोशींकडून भाजप आमदारांचे बौद्धिक
सुमारे दहा ते पंधरा मिनिटे भैय्याजी जोशी यांनी उपस्थित आमदारांचे बौद्धिक घेतले.
Written by विश्वनाथ गरुड
First published on: 17-12-2015 at 11:52 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guidance by bhaiyyaji joshi to bjp mlas in nagpur