लातूर -गुजरात प्रांतात काही रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे हॅक करून महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ समाजमाध्यमात पोस्ट केले जात होते .या प्रकरणात गुजरात सायबर पोलिसांनी तपास सुरू केला व त्याचे थेट धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्याचे आढळून आले.
लातूरातील नारायण नगर भागात राहणारा मूळचा सांगली जिल्ह्यातील जत येथील प्रज्वल अशोक तेली हा नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी लातूरात होता ,तो या कटात सहभागी असल्याचे आढळून आले. गुजरात पोलिसांची टीम लातूरात दाखल झाली होती, त्यांनी स्थानिक पोलिसांना संपर्क केला व त्यांच्या माध्यमातून प्रज्वलला अटक करण्यात आली आहे.
त्याला गुजरातला नेण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांनी दिली. लातूरच्या शिकवणी भागातील गुन्हेगारी वेगवेगळे वळण घेते आहे, मुलींच्या छेडछाडीचे,व्यसनाधिनतेचे प्रकार नित्याचेच आहेत.सायबर गुन्ह्यात नीटची तयारी करणारे मुले आढळत असल्याने शिक्षणक्षेत्रात नवीन चिंता वाढीस लागली आहे.