Gulabrao Patil on Guardian Minister of Jalgaon : “माझ्या कार्यकर्त्यांकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर पालकमंत्री काय असतो हे दाखवून देईन”, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना दिला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार महिनाभरापूर्वी पार पडला असून गुलाबराव पाटलांना पाणीपुरवठा व स्वच्छता खातं मिळालं आहे. निवडणुकीला दोन महिने व मंत्रिमंडळ विस्ताराला एक महिना उलटला तरी अद्याप पालकमंत्रिपदांचं वाटप झालेलं नाही. दरम्यान, पालकमंत्रिपदांची अधिकृत घोषणा होण्याआधीच गुलाबराव पाटील यांनी स्वतःला जळगावचे पालकमंत्री म्हणून घोषित केलं आहे. जळगावातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. याआधीच्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये देखील गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्री होते. जळगाव जिल्हा आपल्याकडे यावा यासाठी पाटील प्रयत्नशील आहेत. भाजपाचे नेते व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे देखील जळगावच्या पाकलमंत्रिपदासाठी गुलाबराव पाटलांबरोबर स्पर्धेत आहेत.

गुलाबराव पाटील म्हणाले, “मी कोणाचं नाव घेत नाही. परंतु, त्या लोकांना बोललं पाहिजे. कोणी आगाऊपणा करू नका. मी आजवर कधी माझं मंत्रिपद दाखवलेलं नाही. परंतु, कोणी आगाऊपणा केला आणि माझ्या कार्यकर्त्यांकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर पालकमंत्री काय असतो ते दाखवून देईन. जळगावात कोणाचीही दादागिरी चालणार नाही. दादागिरी अजिबात खपवून घेणार नाही”.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हे ही वाचा >> Maharashtra News LIVE Updates : “…हा महाराष्ट्राचा अपमान”, अमित शाहांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचा संताप

फडणवीस सरकारसमोर पालकमंत्रिपदाचा तिढा?

महायुतीच्या मंत्र्यांमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्याचं बोललं जात आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय घेण्याचं आव्हान महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसमोर असणार आहे.

हे ही वाचा >> शरद पवारांकडून RSS चं कौतुक, भाजपाशी जवळीक वाढल्याची चर्चा; आव्हाड म्हणाले, “आम्ही संघाच्या विचारसरणीचं…”

पाकलमंत्रिपदाच्या वाटपास उशीर झालेला नाही : माणिकराव कोकाटे

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार माणिकराव कोकाटे म्हणाले, “पालकमंत्रिपदाचे पाटप करण्यासाठी कुठेही उशीर झालेला नाही, अजून वेळ आहे. तसेच अजून जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी अर्थसंकल्प सादर होणं, अर्थसंकल्पातून पैसे येणं आणि त्यानंतर कामे मंजूर होणं, अशा अनेक गोष्टी बाकी आहेत. त्यामुळे पालकमंत्रिपदाचे वाटप करण्यासाठी उशीर झाला आहे असं मला वाटत नाही. तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच याबाबत निर्णय घेतील”.

Story img Loader