संजय राऊत यांनी राजकारण्यांमध्ये खलिस्तान्यांच्या नावावर एखादे नवे पुलवामा घडविण्याची कुवत आहे आणि याची किंमत देशाला चुकवावी लागेल, असा आरोप केला. याबाबत शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. ते शनिवारी (२३ सप्टेंबर) जळगावमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.
संजय राऊतांच्या वक्तव्यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “संजय राऊत यांच्या बोलण्याला आम्ही काहीच किंमत देत नाही.”
व्हिडीओ पाहा :
“ढगफुटी झाली त्या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश”
जळगावमधील पावसाच्या स्थितीवर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “जिल्ह्यात ज्या ठिकाणी ढगफुटी झाली त्या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसात प्राथमिक अहवाल आपल्याकडे सादर होईल. पंचनामा होईपर्यंत नेमकं किती नुकसान झाले हे सांगणे उचित होणार नाही. ६५७ कोटी रुपयांचा आपला नियोजन आराखडा आहे. त्यापैकी ३०० कोटी रुपयांच्या ‘वर्क ऑर्डर’ याठिकाणी जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी निर्णय घेवून दिल्या आहेत.”
हेही वाचा : “मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांची तिरडी बांधली आहे, आता फक्त…”; संजय राऊतांचा हल्लाबोल
“एकाच दिवशी एवढ्या ‘वर्क ऑर्डर’ देण्याचा हा पहिलाच प्रसंग”
“महाराष्ट्रातील हा पहिलाच विषय आहे की, सप्टेंबर महिन्याच्या विविध विभागांच्या ५० टक्के कामांना आपण प्रशासकीय मान्यता देत आहोत. एकाच दिवशी एकाच छताखाली एवढ्या ‘वर्क ऑर्डर’ देण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. डिसेंबर महिन्याच्या आत सर्व कामांचे आदेश काढून कामांना सुरुवात करायची आहे,” असंही गुलाबराव पाटलांनी नमूद केलं.