राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या भाषण शैलीवरून जोरदार टोलेबाजी केली. “मी गावरान माणूस आहे, दादा कोंडकेंचा चित्रपट पाहणारा माणूस आहे. मी द्वीअर्थी बोलणारच,” असं मत गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलं. तसेच मी मुकं मुकं बोललो, तर बामणाने मंत्र म्हटल्याप्रमाणे होईल, असंही म्हटलं. ते सोमवारी (३१ ऑक्टोबर) जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात धानोरा येथे बोलत होते.

गुलाबराव पाटील म्हणाले, “माणूस चार अर्थाने बोलतो, पण हा एकच अर्थ काढतात. माझी अपेक्षा आहे की, मी गावरान माणूस आहे, दादा कोंडकेंचा चित्रपट पाहणारा माणूस आहे. मी द्वीअर्थी बोलणारच ना. मी मुकं मुकं बोललो, तर बामणाने मंत्र म्हटल्याप्रमाणे होईल.”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

“इथंही आपलं दुकान चांगलं चाललंय”

“मी कीर्तनकार असतो, तर आज जेवढी गर्दी आहे त्यापेक्षा पाचपट गर्दी असली असती. मी योगायोगाने या धंद्यात आलो. तुमच्या आशीर्वादाने, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने इथंही आपलं दुकान चांगलं चाललंय,” असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.

व्हिडीओ पाहा :

“आमचं नाव अलीबाबा आणि चाळीस चोराप्रमाणे झालंय”

गुलाबराव पाटलांनी शिवसेनेतील बंडखोरीवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “महाराष्ट्रात सर्वांचा निर्णय घेणारा मुख्यमंत्री झाला आहे. मात्र, आमचं नाव अलीबाबा आणि चाळीस चोराप्रमाणे झालंय. आमची बदनामी सुरू आहे. आम्ही जे केलं ते सदसदविवेक बुद्धीने केलं आहे, बाळासाहेबांसाठी, भगव्या झेंड्यासाठी, राज्याचं भलं व्हावं यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.”

“…तर तुमची ‘सुरत’ तुटल्याशिवाय राहत नाही”

“मी तर ३३ व्या क्रमांकाला एकनाथ शिंदेंसोबत गेलो. माझ्या आधी तर खूप लोक गेले होते. आम्ही पहिल्यांदा २०-२२ आमदार उद्धव ठाकरेंकडे गेलो होतो. त्यांना सांगितलं की, आमदार वापीपर्यंत पोहचले आहेत, त्यांना परत बोलवा. ते सुरतमध्ये घुसले तर तुमची ‘सुरत’ (चेहरा) तुटल्याशिवाय राहत नाही,” असं मत गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलं.

“उद्धव ठाकरेंनी २२ आमदारांचंही ऐकून घेतलं नाही”

“उद्धव ठाकरेंना आमदारांना परत बोलवा असं सांगूनही त्यांनी २२ आमदारांचंही ऐकून घेतलं नाही. तुम्हाला जायचं असेल, तर तुम्हीही जा म्हणाले. कोणीही का असेना, पण माणसाला राग येतो,” असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला.

हेही वाचा : VIDEO: जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांचं भाषण सुरू असताना अजान सुरू झालं अन्…

शिवसेना खासदार संजय राऊतांवर निशाणा साधताना गुलाबराव पाटील म्हणाले, “संजय राऊत म्हणाले होते की, हे दिसायला सिंहाप्रमाणे आहेत, पण मन उंदराप्रमाणे आहे. त्यांना माहिती नाही की उंदीर एकदा घुसला तर चांगल्या चांगल्यांना कुरतडतो.”

Story img Loader