मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात आम्ही नुकतीच ५० थरांची दहीहंडी फोडल्याचं वक्तव्य केलं. यातून त्यांनी नुकतीच शिवसेनेत झालेली बंडखोरी आणि ५० आमदारांनी त्यांना दिलेला पाठिंबा यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे. आता त्यावर पत्रकारांनी विचारलं असता शिंदे गटाचे नेते, मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुलाबराव पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते सत्य आहे. त्यांच्या ५० थरांच्या दहीहंडीमुळेच सत्तांतर झालं.”

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शनिवारी (२० ऑगस्ट) जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. आदित्य ठाकरेंच्या या जळगाव दौऱ्याविषयी विचारलं असता गुलाबराव पाटील म्हणाले, “त्यांना येऊ द्या, त्यांच्या पक्षाचं काम आहे आणि त्यांनी ते केलंच पाहिजे.”

हेही वाचा : “आम्ही ५० थरांची हंडी फोडली” टेंभी नाका दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंची राजकीय टोलेबाजी

“करोनामुळे देशभरात उत्सव बंद होते. यंदा राज्य सरकारने याला वेगळ्या प्रकारे मान्यता दिली. त्यामुळे दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सर्व जनतेने आनंद उत्सव साजरा केला,” असंही पाटील यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gulabrao patil comment on statement of cm eknath shinde over 50 tier pyramid rno news pbs