बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंगांपैकी सहावं ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी केला आहे. यासंदर्भातील जाहिरात आसामच्या पर्यटन विभागाने काढली आहे. या जाहीरातीवर आता राज्यातून जोरदार टीका होत असताना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच यावेळी बोलताना त्यांनी सुप्रिया सुळेंच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा – महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष : सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवाद पूर्ण; संजय राऊत म्हणाले, “शिवसेना ही…”
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
देव सगळीकडे आहे. देव दगडातही आहे. मुळात टीका करणं सोप्प आहे. मात्र, विरोधकांना देवावरून राजकारण करायचं असेल तर त्यांनी ते करत राहावं. कोणी कितीही दावा केला, तरी सत्य बदलत नाही. देव ज्या ठिकाणी आहे, लोक त्यालाच मानतात. अशा दाव्यांनाही काहीही अर्थ नसतो, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली.
हेही वाचा – “मविआ सरकार तोडताना केलेल्या मदतीची ही परतफेड आहे का?” सचिन सावंतांचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल!
पुढे बोलताना त्यांनी सुप्रिया सुळेंच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. “शिंदे सरकार गुवाहाटीला आमदारांची फौज घेऊन गेले होते, तिथं त्यांची चांगली सोय झाली होती. बदल्यात मुख्यमंत्र्यांनी आसामला भीमाशंकर ज्योतिर्लिंग तर दिले नाही ना?” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. संदर्भात बोलताना, “पहाटेच्या शपथविधीवेळी राजभवनावर अजितदादांची आणि राष्ट्रवादीची चांगली व्यवस्था झाली होती”, असा टोला त्यांनी सुप्रिया सुळेंना लगावला.