गेल्यावर्षी २० जून रोजी शिवसेना पक्षात बंडखोरी झाली होती. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्याने महाराष्ट्रातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकार कोसळलं. एवढ्या मोठ्या संख्येनं आमदारांनी केलेल्या बंडामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून निघालं. शिवसेनेतील बंडखोरीच्या घटनेला आता वर्षाहून अधिकचा कालवधी लोटला आहे. पण या बंडखोरीबाबतचे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बंडखोरीदरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे. शिंदे गटात सामील होण्यापूर्वी आपण १५ ते २० आमदारांसह उद्धव ठाकरेंना भेटलो होतो, असा दावा गुलाबराव पाटलांनी केला. उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर काही आमदार पसार झाले, असं विधान गुलाबराव पाटलांनी केलं. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या एका मुलाखतीत ते बोलत होते.

kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड
Shinde Fadnavis move by transferring Gadchiroli District Collector Gadchiroli news
गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करून शिंदेना फडणवीसांचा शह?
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…

हेही वाचा- Viral Video: पाकिस्तानच्या पंतप्रधानाने भरपावसात महिलेची छत्री हिसकावली, नेटकरी म्हणाले, “अशा कार्टुनला…”

गेल्यावर्षी आजच्या दिवशी म्हणजे २४ जून रोजी तुम्ही कुठे होता? बंडखोरीबाबत काय स्थिती होती? या प्रश्नावर गुलाबराव पाटील म्हणाले, “गेल्या वर्षी २४ जूनला मी महाराष्ट्रातच होतो. मी माझ्या प्रत्येक भाषणात सांगितलंय की, मी ३३ व्या नंबरला तिकडे (शिंदे गटात) गेलो. जाण्याआधी मी स्वत: उद्धव ठाकरेंना भेटलो होतो. माझ्याबरोबर १५-२० आमदार एकत्र होते. मी उद्धव ठाकरेंना सर्व स्थिती सांगितली होती. तोपर्यंत केवळ ११ ते १२ आमदार सुरतपर्यंत पोहोचले होते.”

हेही वाचा- “शरद पवार अजितदादांना राष्ट्रीय अध्यक्ष करतील, असं…”, चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान चर्चेत!

“तेव्हा आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितलं की, त्या आमदारांना (बंडखोर आमदार) आपण परत बोलवू पण उद्धव ठाकरेंबरोबर असलेल्या काहींनी आमचं ऐकून घेतलं नाही. त्यानंतर आम्ही पाच-सहाजण आदित्य ठाकरेंच्या गाडीतून एका हॉटेलवर गेलो. तेथून मी माझ्या बंगल्यावर गेलो. तिथे मी रात्रभर राहिलो, तोपर्यंत बाकी लोक पसार झाले होते. तोपर्यंत बंडखोरी होतेय, हेही कुणाच्या लक्षात आलं नव्हतं” असं गुलाबराव पाटलांनी सांगितलं.

Story img Loader