राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि भाषणांमुळे प्रसिद्ध आहेत. आपल्या भाषणांमध्ये ते हिंदी चित्रपटांमधील प्रसिद्ध संवाद बोलून दाखवतात. जळगावातील एका सभेतील गुलाबराव पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओ समोर आला आहे. या सभेत शिवसेनेच्या सध्याच्या स्थितीवर भाष्य करताना गुलाबराव पाटील यांनी डायलॉगबाजी केली. गुलाबराव पाटील यांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या दबंग चित्रपटातील लोकप्रिय संवाद बोलून दाखवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुलाबराव पाटील म्हणाले, केंद्रात कोणाला मदत लागत असेल तर भाजपावाले आपले मोठे भाऊ तिथे उपस्थित आहेत. आम्ही शिंदे गटाचे लोक आहोत. आमचे दोन तुकडे झाले आहेत. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे साथ आ जाओ, अशी स्थिती आहे. केंद्रात कोणाला मदत लागत असेल तर भाजपा इथं उपस्थित आहे. आम्हीपण त्यांच्याबरोबर युतीत आहोत. आमची तिथेही चंचू ताकद आहे.

दोन दिवसांपूर्वी जळगावातल्या धरणगाव येथील एका कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी अशीच शाब्दिक फटकेबाजी केली होती. माझ्या नशिबात असेल तर मी पुन्हा निवडून येईन अन्यथा येणार नाही असं पाटील म्हणाले होते. आपल्या नशिबात असेल तर आगामी निवडणुकांमध्ये आपण सर्वांना चारी मुंड्या चित करून पुन्हा भगवा घेऊन येऊ, मात्र नशिबात नसेल तर येणार नाही, असं ते म्हणाले होते.

हे ही वाचा >> ओबीसी आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीत तुम्ही एकटे पडलाय का? छगन भुजबळ म्हणाले, “मी जबाबदारीने…”

गुलाबराव पाटील म्हणाले, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण कार्य करत आहोत मात्र मतांसाठी आपण हे कार्य करत असल्याची टीका होते. मी मतं मिळावीत म्हणून कुठलंही काम करत नाही. धर्मासाठी हे काम करतो आहे. आपण समाजाचं देणं लागतो म्हणून आपण ते करत आहोत. त्यामुळे नशिबात असेल तर मी निवडणुकीत पुन्हा निवडून येईल नसेल तर येणार नाही. मात्र जे कार्य मी करत आहे ते मरेपर्यंत असेच करत राहणार.