शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दोन दिवसांपूर्वी (१९ जून) शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त जाहीर सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. पुन्हा एकदा ते या यामदारांना गद्दार म्हणाले. आमदारांनी शिवसेना सोडण्यासाठी खोके (पैसे) घेतल्याचा उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला शिंदे गटाने प्रत्युत्तर दिलं आहे. यावर एकनाथ शिंदे, दीपक केसरकर यांच्यानंतर आता गुलाबराव पाटलांनी उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुलाबराव पाटील म्हणाले, त्यांच्याकडे (ठाकरे गट) बोलायला दोनच मुद्दे आहेत, एक गद्दार आणि दुसरा खोके. ठिक आहे, परंतु ३५ वर्ष आम्ही तिथेच घासली आहेत. त्यांनी आमची बॅक हिस्ट्री चेक करावी (इतिहास तपासावा). आम्ही घरांवर तुळशीपत्र ठेवून कामं केली आहेत. गद्दारी करायचीच असती तर नारायण राणेंनी केली तेव्हाच गेलो असतो. त्यावेळी मी आमदार होतो आणि त्यावेळीही आम्हाला ऑफर होती. राज ठाकरे गेले तेव्हाही गद्दारी करू शकलो असतो, परंतु आम्ही तसं केलं नाही.

हे ही वाचा >> “…तर आमची मनं वळली असती”; गुलाबराव पाटलांनी सांगितलं ११ आमदार फुटल्यानंतर ‘वर्षा’वर काय घडलं?

गुलाबराव पाटील म्हणाले, “यावेळी मात्र विचारांचा विषय आला. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी बांधलेली शिवसेना लयाला जातेय असं वाटू लागलं होतं. सुरुवातीला जेव्हा काही आमदार तिकडे गेले, तेव्हा आम्ही सांगून सुद्धा उद्धव ठाकरे यांनी ऐकलं नाही. कोणीतरी एखादा तीनपाट माणूस त्यांना (उद्धव ठाकरे यांना) सल्ले देत होता आणि ते त्याचं ऐकत होते. मी तर ३३ नंबरला (फुटलेल्या आमदारांमधले ३३ वे आमदार) गेलो ना? मी त्यांना सांगून गेलो.” गुलाबराव एबीपीमाझाशी बोलत होते.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या खोकेबहाद्दर या टीकेलाही गुलाबरावांनी उत्तर दिले. ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाने आमच्या पक्षाला मान्यता दिली आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला खोके बोलणारे कोण? तुमचं तिकडे काँग्रेसशी आय लव्ह यू सुरू आहे. त्यावर बोला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gulabrao patil says when narayan rane left shiv sena we had an offer asc
Show comments