Gulabrao Patil on Ajit Pawar, Mahayuti & Maharashtra Assembly Election Results 2024 : एकीकडे महायुतीने अद्याप सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. त्यामुळे महायुतीवर विरोधक टीका करत असतानाच महायुतीचे नेते देखील एकमेकांवर टीका करताना दिसू लागले आहेत. महायुतीमधील काही नेत्यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळत आहे. “महायुतीत अजित पवार आमच्या मध्ये (भाजपा व एकनाथ शिंदेंची शिवसेना) नसते तर आमच्या ९० ते १०० जागा निवडून आल्या असत्या”, असा दावा शिवसेनेचे (शिंदे) नेते गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. त्यावर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीने (अजित पवार) उत्तर दिलं आहे. या पक्षाचे प्रवक्ते व विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी गुलाबरावांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. मिटकरी म्हणाले, “अजित पवार नसते तर शिंदे गटाच्या ९० ते १०० जागा आल्या असत्या हा गुलाबराव पाटलांचा गोड गैरसमज आहे. त्यांनी महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये”.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा