मिरज तालुक्यातील खटाव येथे ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या विजयानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या आनंदोत्सवादरम्यान दुर्घटना घडली आहे. औक्षणादरम्यान उत्साही कार्यकर्त्यांनी उधळलेला गुलाल पेटत्या आगीवर पडल्यामुळे आगडोंब उसळून नूतन सरपंचासह तिघेजण भाजल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- Gram Panchayat Election Result 2022 : अलिबाग- ग्रामपंचायत निवडणुकीत रायगडात बाळासाहेबांच्या शिवसेनेचा वरचष्मा

भाजपाचे नूतन सरपंच रावसाहेब बेडगे विजयानंतर गावात मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी फिरत होते. यावेळी विजयाच्या घोषणा देत समर्थकही सोबत होते. आनंदाच्या जल्लोषात गुलाल उधळला जात होता. या दरम्यान विजयी सरपंचांचे औक्षण करण्यासाठी काही महिला आरतीसह सामोर आल्या. त्या ओवाळणी करत असतानाच उधळलेला गुलाल पेटत्या आरतीवर पडल्याने भडका उडाला. यामध्ये सरपंच बेडगे यांच्यासह तीन कार्यकर्त्यांना भाजले असून त्यांना उपचारासाठी तात्काळ मिरजेतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.