केंद्रात भाजप सत्ता येऊन चार वर्षांचा कालावधी लोटला असून या कालावधीत एकही निर्णय सर्व सामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले नाही. तर सरकारी यंत्रणावर दबाव आणून हुकूमशाही पध्द्तीने कारभार भाजप सरकारकडून चालवला जात आहे.त्यामुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे.अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

पश्चिम महाराष्ट्रापासून कोल्हापूर च्या देवीचे दर्शन घेऊन 31 ऑगस्टपासून कोल्हापूर, सातारा,सांगली,सोलापूर आणि पुणे या भागात जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली.या पश्चिम महाराष्ट्रचा अखेरच्या टप्प्याची समारोपाची सभा आज पुण्यातील एसएसपीएमएस मैदानावर गुलाम नबी आजाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारीमलिकर्जुन खर्गे,काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण,विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे,माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह आजी माजी पदाधिकारी सहभागी सहभागी झाले आहेत.

यावेळी गुलामनबी आझाद म्हणाले की,स्वातंत्र्यपूर्व काळात बाहेरील व्यक्तीकडून आपल्याला धोका होता.मात्र सध्याचे देशातील वातावरण लक्षात गबेता आपल्याला आपल्या व्यक्तीकडून धोका असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.तर काँग्रेसच्या नेत्यांनी,पदाधिकायांनी देशाच्या स्वातंत्र्यमध्ये कारवास भोगला किंवा बलिदान देखील दिले.मात्र भाजपकडून कोणत्याही नेत्यांचे स्वातंत्र्यमध्ये किंवा सध्याच्या सरकारमध्ये काही ही योगदान नाही.अशा शब्दात केंद्राच्या कारभारावर टीका केली.
ते पूढे म्हणाले की, कश्मीरमधील आमची सत्ता असताना दहशतवाद संपवला.मात्र भाजप ची त्या ठिकाणी सत्ता आल्यावर आणखी दहशतवाद वाढला असून याला सर्वस्वी जबाबदार भाजप सरकार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

ते पुढे म्हणाले की,लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत खूप आश्वसने दिल्याने ते सत्तेमध्ये आले आहेत.त्यांना कोणतेही आश्वसने पूर्ण करता आली नाही.त्यामुळे नोटबंदीचा निर्णय घेऊन अर्थ व्यवस्था धोक्यात आणण्याचे काम त्यांनी केले आहे.नोटबंदीच्या निर्णयाने अनेकांच्या हाताला रोजगार राहिला.त्यावर कोणी ही काही बोलण्यास तयार नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की,देशात मागील महिन्यापासून संविधान बदलण्याची चर्चा सुरू आहे.संविधानामध्ये बदल केल्यास लोकशाही धोक्यात येईल.त्यामुळे या गोष्टीकडे सर्वानी लक्ष ठेवण्याची गरज असून असे प्रकार हानून पाडण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Story img Loader