राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून मंत्री गुलाबराव पाटील हे सातत्याने शिवसेनेवर ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) टीकास्त्र सोडत आहेत. त्यात शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात पोहचली आहे. सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सुद्धा हजेरी लावली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुषमा अंधारे यांच्या वतीने सुरु असलेली महाप्रबोधन यात्रा जळगाव जिल्ह्यात पोहचली. महाप्रबोधन यात्रेची पहिली सभा गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव येथे पार पडली. शिवसेनेच्या या सभेत राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर उपस्थित होते. गुलाबराव देवकर शिवसेनेच्या व्यासपीठावर दिसल्याने सर्वांच्या आश्चर्यांचा धक्का बसला होता.

हेही वाचा : “महाराष्ट्राला कंगाल बनविण्यासाठी…” शिवसेनेचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल; मोदी, शाहांचा ‘किडनॅपर’ उल्लेख करत म्हणाले…

गुलाबराव पाटील यांचे राजकीय विरोधक गुलाबराव देवकर शिवसेनेच्या स्टेजवर आल्याने चर्चा रंगल्या आहेत. गुलाबराव देवकर यांचा परभाव करूनच गुलाबराव पाटील निवडून गेले होते. त्यामुळे गुलाबराव पाटील यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटाने एकत्र आल्याचे बोललं जात आहे.

हेही वाचा : आपल्या पंतप्रधानांच्या डोक्यात एखाद्या संगणकापेक्षाही जलदगतीने विचार येतात – भगतसिंह कोश्यारी

यावेळी गुलाबराव देवकर यांनी गुलाबराव पाटील यांचा समाचार घेतला आहे. “५०-५० खोके आले. त्यानंतर शिंदे सरकार आल्यानंतर पाणीपुरवठा खाते गुलाबराव पाटील यांनी घेतलं. मात्र, धरणगाव शहराला २५-२५ दिवस पाणी येत नाही. मग, तुम्हाला मंत्री आणि आमदार म्हणून राहायचा अधिकार आहे का?,” असा सवाल गुलाबराव देवकर यांनी विचारला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gulbrao devkar reach shivsena sushma andhare mahaprabodhan yatra in jalgaon ssa