वाई : वाई येथील एमआयडीसीमध्ये सोमवारी रात्री मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी एकाने गोळीबार केला. या घटनेत एक युवक जखमी झाला असून अमन सय्यद असे त्याचे नाव आहे. त्याच्या हाताला गोळी लागली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली असून पोलिस रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी तळ ठोकून होते.
अमन सय्यद व अक्षय निकम यांच्यात जुना वाद आहे. यातूनच सोमवारी रात्री एमआयडीसी येथे अमन याचा अक्षयसह त्याच्या साथीदाराबरोबर वादावादी झाली. त्यावेळी अचानक अक्षयच्या साथीदाराने बंदुक काढून गोळीबार केला. मात्र सय्यदने बचाव करत गोळी हातावर झेलल्याने त्याला गंभीर दुखापत झाली नाही; मात्र गोळीबार झाल्याने परिसर हादरून गेला.
हेही वाचा…Parliament Session : मराठी नव्हे इंग्रजीत… निलेश लंकेंचा संसदेत पहिला शपथविधी, शेवटी म्हणाले…
जखमी सय्यद याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती कळताच पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी सोबत पोलिसांनी चर्चा केली. हल्लेखोरांची माहिती घेऊन पोलिसांनी तत्काळ त्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी अक्षय निकम याला ताब्यात घेतले आहे. तर त्याच्या साथीदाराने पळ काढला आहे.
हेही वाचा…मोठी बातमी! भाजपाच्या सूर्यकांता पाटील यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
गोळी बाराची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस अधीक्षक समीर शेख,अप्पर अधीक्षक आंचल दलाल,स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व सहकारी, सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे दाखल झाले. अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे करत आहेत.या घटनेत गोळीबार केलेला आणि जखमी झालेला दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. या गोळीबाराचा गुन्हेगारी टोळ्यांशी काही संबंध आहे की नाही हे पोलीस तपासत आहेत.
© The Indian Express (P) Ltd