नांदेड – जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, मुखेड व लोहा तालुक्याला मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा व गारपिटीचा तडाखा बसला. यामध्ये केळी, हळदीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत का? फडणवीसांनी पाच शब्दांत दिलं उत्तर, म्हणाले…
मागील पंधरा दिवसांपासून अधून-मधून जिल्ह्याला गारपिटीचा सामना करावा लागला आहे. जनावरे जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आपत्ती व्यवस्थापन संदर्भात प्रशासनाशी फोनद्वारे संपर्क साधून शेतकऱ्यांच्या व्यथा पोहोचवल्या. गारपिटीने हळद, केळी, भुईमूग, ऊस, यासह आंबा, चिकू, मोसंबी संत्री पिकाचे मोठे नुकसान झाले.